18 जागांवरील ओबीसी आरक्षणामुळे नगरपंचायतीचा निकाल लांबणीवर, 208 उमेदराचे भवितव्य यंत्रात सीलबंद!

| Updated on: Dec 22, 2021 | 5:06 PM

जिल्ह्यातील 4 नगरपंचायतीच्या 52 जागांसाठी मंगळवारी मतदान शांततेत पार पडले आहे. 208 उमेदवारांचे राजकीय भवितव्य आता यंत्रात सीलबंद झाले असून ते नेमके काय असणार आहे यासाठी आता उमेदवारांसह जनतेला महिन्याभराची प्रतिक्षा करावी लागणार आहे. जिल्ह्यात 18 जागांवर ओबीसीचे आरक्षण आहे. त्यामुळे आता या जागांवरील मतदान हे 18 जानेवारी 2022 रोजी होणार असून निकाल हा 19 जानेवारीला लागणार आहे.

18 जागांवरील ओबीसी आरक्षणामुळे नगरपंचायतीचा निकाल लांबणीवर, 208 उमेदराचे भवितव्य यंत्रात सीलबंद!
हे अधिकार तुम्हा माहिती हवेत
Follow us on

लातूर : जिल्ह्यातील 4 नगरपंचायतीच्या 52 जागांसाठी मंगळवारी मतदान शांततेत पार पडले आहे. 208 उमेदवारांचे राजकीय भवितव्य आता यंत्रात सीलबंद झाले असून ते नेमके काय असणार आहे यासाठी आता उमेदवारांसह जनतेला महिन्याभराची प्रतिक्षा करावी लागणार आहे. जिल्ह्यात 18 जागांवर ओबीसीचे आरक्षण आहे. त्यामुळे आता या जागांवरील मतदान हे 18 जानेवारी 2022 रोजी होणार असून निकाल हा 19 जानेवारीला लागणार आहे. मात्र, त्यापूर्वी झालेल्या 62 मतदान केंद्रावर शांततेत मतदान पार पडले आहे. जिल्ह्यात अधिकतर नगरपंचायती ह्या काँग्रेस आणि भाजपाच्याच ताब्यात आहेत. त्यामुळे या दोन प्रमुख पक्षातच रस्सीखेच सुरु असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

मतदान प्रक्रियेतही ‘लातूर पॅटर्न’ची चर्चा

मंगळावारी तब्बल 62 केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली आहे. जिल्ह्यातील 4 नगरपंचायतीमधील 52 जागांसाठी ही सार्वत्रिक निवडणूक झाली आहे. मात्र, चार ही नगरपंचायतीच्या मतदान केंद्रावर ही निवडणूक शांततेत पार पडलेली आहे. आतापर्यंतच्या अनेक सार्वत्रिक निवडणूका कुठेही गालबोट न लागता लातूरकरांनी पार पाडलेल्या आहेत. तीच परंपरा आताही कायम ठेवली आहे. पोलीस बंदोबस्त तर तैनात करण्यात आला होताच पण कुठेही कोणती घटना घडली नसून शांततेत ही प्रक्रिया पार पडली आहे.

25 हजार मतदारांनी बजावला हक्क

जिल्ह्यातील देवणी, चाकूर, शिरुर अनंतपाळ आणि जळकोट या चार नगरपंचायतीसाठी 25 हजार 213 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे. यामध्ये 13 हजार 324 पुरुष तर 11 हजार 889 महिलांचा समावेश होता. चाकूर नगरपंचायतीमध्ये सर्वाधिक मतदानाचा टक्का आहे तर सर्वात कमी मतदान शिरुर अनंतपाळ येथे 4937 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे.

आता केवळ चर्चा

ओबीसी आरक्षणामुळे आता उर्वरीत 16 जागांसाठी मतदान हे 18 जानेवारी रोजी होणार आहे. तब्बल महिन्याभराचा कालावधी असल्याने आता केवळा वेगवेगळ्या अनुशंगाने चर्चाच रंगणार आहे. स्थानिक पातळीवरील निवडणूक असल्याने निकालाबाबतचे तर्क-वितर्क मांडले जाणार. वेगवेगळे अंदाज बांधले जाणार आहे. ओबीसी आरक्षणाची तिढा सुटल्यानंतरच 18 जानेवारीला ही मतदान प्रक्रिया पार पडणार असून त्यानंतर 19 जानेवारीला निकाल लागणार आहे.

संबंधित बातम्या :

Palghar: वारंवार सूचना देऊनही विद्यार्थ्यांनी ऐकले नाही, संतापलेल्या मुख्याध्यापकांनी स्वतःच कात्रीने कापले केस

औरंगाबाद रेल्वे स्टेशनसमोरचा पेट्रोलपंप अखेर हटवला, वक्फ बोर्डाचा विरोध प्रशासकांनी झुगारला

Electricity Theft: वीज चोरीची पद्धत पाहून महावितरणही चक्रावले, औरंगाबादच्या नारेगावात काय घडले?