याच त्या नगरपंचायती जिथल्या निवडणूका ओबीसी आरक्षणाशिवाय होतील, 21 डिसेंबर ऐतिहासिक ठरणार!

| Updated on: Dec 15, 2021 | 3:54 PM

32 जिल्ह्यात 102 नगरपंचायतीसाठी मतदान होणार आहे. तर 7 नगरपरिषदा / नगरपंचायतीसाठी पोटनिवडणुका होणार आहेत. त्यात दोन जिल्हा परिषदांचाही समावेश आहे, त्याअंतर्गत येणाऱ्या 15 नगरपंचायतींनाही याचा फटका बसणार आहे.

याच त्या नगरपंचायती जिथल्या निवडणूका ओबीसी आरक्षणाशिवाय होतील, 21 डिसेंबर ऐतिहासिक ठरणार!
ऑर्केस्ट्रा बारमधील परफॉर्मन्ससाठीची महाराष्ट्र सरकारची 'ही' अट रद्द
Follow us on

मुंबई : सुप्रीम कोर्टाच्या दणक्यानंतर राज्यात तब्बल 32 जिल्ह्यात ओबीसी आरक्षण नसल्याचा फटका बसणार आहे. कारण 32 जिल्ह्यात 102 नगरपंचायतीसाठी मतदान होणार आहे. तर 7 नगरपरिषदा / नगरपंचायतीसाठी पोटनिवडणुका होणार आहेत. त्यात दोन जिल्हा परिषदांचाही समावेश आहे, त्याअंतर्गत येणाऱ्या 15 नगरपंचायतींनाही याचा फटका बसणार आहे. फक्त नगरपंचायतीच नाही तर 5 महानगरपालिकेतही एकेका जागेसाठी 21 तारखेला मतदान होणार आहे. त्यामुळे राज्य सरकारपुढे सर्वात मोठा पेच तयार झाला आहे.

ओबीसी आरक्षण नसल्याचा या गावांना जास्त फटका

ठाणे जिल्हा- शहापूर, मुरबाड, पालघर, मोखाडा ,विक्रमगड, लालसरी . रायगड- तळा, खालापूर, मानगाव, कोल्हापूर-म्हसळा, पाली, रत्नागिरी-दापोली, मंडणगड, सिंधूदुर्ग – वैभववाडी, दोडामार्ग-कसई, कुडाळ, पूणे जिल्हा -देहू, सातारा जिल्हा- दहवडी, वडूज, खंडाळा, पाटण, लोणंद, कोरेगाव, सांगली जिल्हा-कवठेमहंकाळ, खानापूर, कडेगाव, सोलापूर जिल्हा-महाळूंग, श्रीपूर, माळशिरस, माढा, वैराग, नातेपुते, नाशिक जिल्हा-कळवण, सुरगणा, देवळा, पेट, निफाड, धूळे जिल्हा- साक्री, नंदूरबार जिल्हा- धडगाव-वडफळ्या-रोशनमाळ, अहमदनगर जिल्हा-कर्जत, अकोले, पारनेर, शिर्डी, जळगाव जिल्हा-बोधवड, औरंगाबाद जिल्हा-सोयगाव, यवतमाळ जिल्हा-महागाव, कळंब, बाभूळगाव, राळेगाव,जामनी, झरी, मारेगाव, बुलडाणा जिल्हा-संग्रामपूर, मोताळा, अमरावती जिल्हा- तिवसा, भातुकली, हिंगोली जिल्हा-औंढा-नागनाथ, सेनगाव, नांदेड जिल्हा-माहूर, अर्धापूर, नायगाव, उस्मानाबाद जिल्हा-लोहारा बु. वाशी, लातूर जिल्हा-शिरुर अनंतपाळ, देवणी, चाकूर, जळकोट, बीड जिल्हा-  शिरूर कासार, केज, आष्टी, पाटोदा, वडवणी, परभणी जिल्हा-पालम, जालना जिल्हा, जाफराबाद, मंठा, घनसावंगी, तिर्थपूरी,बदनापूर वाशिम जिल्हा- मनोरा, भंडारा जिल्हा-लाखांदूर, लाखनी, मोहाडी, वर्धा जिल्हा-समुद्रपूर, आष्टी, कारंजा, सेलू, नागपूर जिल्हा-हिंगणा, कुही, गोंदिया जिल्हा,सावली,अर्जूनी, देवरी, सड-अर्जूनी, गडचिरोली जिल्हा- भामरागड, कुरखेडा, धानोरा, सिरोंचा, चामोर्शी, अहेरी, कोर्ची, एटापल्ली, चंद्रपूर जिल्हा-कोंभूर्णा, गोंड पिंपरी, कोरपणा, जिवती, मुलचेरा, शिंदेवाही लोणवाही.

 

पोटनिवडणुका 7 ठिकाणी-नगरपरिषद/ नगरपंचायत
शिरोळ – 6 अ
जत – 5 ब
नागभीड- 4 अ
सिल्लोड- 12 अ
वानाडोंगरी- 6 अ
फुलंब्री- 2 आणि 8
ढाणकी- 12 आणि 13

या गावांना आणि नगरपंचायती, नगरपरिषदांना या निकालाचा मोठा फटका बसणार आहे.

Aryan Khan | दर शुक्रवारी NCB ऑफिसवारी टळली, आर्यन खानच्या जामीन अटीत बदल

OBC Reservation | सरकारचे अज्ञान, अहंकार आणि प्रचंड दुर्लक्ष नडले; पकंजांची घणाघाती टीका, निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी

Nashik|‘महाप्रित’मधून अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकांना उद्योग, स्वयंरोजगार मिळावा; सामाजिक न्याय मंत्री धंनजय मुंडे यांचे आवाहन