
NMC Election Results 2026 LIVE : सध्या राज्यात महानगरपालिकांची निवडणूक चालू आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार आणि कोणाला दणका बसणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या निवडणुकीत नागपूर महानगपालिकेत नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस आणि भाजपाने पूर्ण जोर लावलेला आहे. नागपूर महापालिकेत प्रभाग क्रमांक 19 आणि प्रभाग क्रमांक 20 मध्ये कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
नागपूर महापालिकेत एकूण 38 प्रभाग आहेत. यातील 37 प्रभागात प्रत्येकी 4 उमेदवार आहेत. तर एका प्रभागात 3 उमेदवार आहेत. नागपुरात एकूण 151 जागांसाठी निवडणूक होत आहे. 2017 साली येथे भाजपाची सत्ता होती. या निवडणुकीत भाजपाने भाजप 108 जागांवर विजय मिळवला होता. तर काँग्रेसला फक्त 29 जागांवर विजय मिळवता आला होता. नागपुरात बसपाने मोठी कमाल केली होती. येथे बसपाचा एकूण दहा जागांवर विजय झाला होता. शिवसेनेला दोन जागांवर विजय मिळाला होतो. राष्ट्रवादीला एक आणि अपक्ष पक्षाला एक जागा मिळाली होती.
Maharashtra Election Results 2026 : 17 पैकी 16व्या प्रभागात तीनही जागा काँग्रेसला
Maharashtra Election Results 2026 : पराभवानंतर अजित पवारांची पहिली मोठी प्रक्रिया..
मुंबईच्या प्रभाग क्रमांक 190 मधून भाजपच्या शीतल गंभीर विजयी
मुंबई मालाड पश्चिम प्रभाग क्रमांक 49 मधून काँग्रेसच्या उमेदवार संगीता कोळी विजयी
सांगली महापालिकेतील फायन आकडा घ्या जाणून
सातारकरांनी अनुभवली खासदार उदयनराजे आणि शंभूराज देसाई यांची मैत्री
नागपूर महानगरपालिकेत भाजपा एकूण 143 जागा लढवत आहेत. शिवसेना (शिंदे गट) पक्षाने एकूण 8 जागांवर उमेदवार उतरवले आहेत. तर अजित पवार यांची राष्ट्रवादी एकूण 96 जागा लढवत आहे. दुरीकडे काँग्रेस पक्षाने एकूण 151 जागांवर उमेदवार उतरवले आहेत. ठाकरे गटानेही 56 जागांसाठी उमेदवार दिले आहेत. शरद पवार यांची राष्ट्रवादी 79 जागा लढवत आहे. वंचित बहुजन आघाडी या पक्षानेही 75 जागांवर आपले उमेदवार दिले आहेत. यावे मनसेनेही 22 जागा लढवण्याचे ठरवले आहे. एमआयएम पक्षाने 3 जागांवर उमेदवार उतरवले आहेत. बसपा हा पक्ष एकूण आठ जागा लढवत आहे.
प्रभाग क्रमांक 19 अ- पक्ष- भाजपा- विजयी उमेदवाराचे नाव- संजयकुमार बाळपांडे
प्रभाग क्रमांक 19 ब- पक्ष- भाजपा-विजयी उमेदवाराचे नाव- विद्या कन्हेऱे
प्रभाग क्रमांक 19 क- पक्ष- भाजपा- विजयी उमेदवाराचे नाव- सरला नायक
प्रभाग क्रमांक 19 ड- पक्ष-भाजपा -विजयी उमेदवाराचे नाव- दयाशंकर तिवारी
प्रभाग क्रमांक 20 अ- पक्ष भाजपा- -विजयी उमेदवाराचे नाव- शकुंतला पारवे
प्रभाग क्रमांक 20 ब- पक्ष- भाजपा -विजयी उमेदवाराचे नाव- यशश्री नंदनवार
प्रभाग क्रमांक 20 क- पक्ष-काँग्रेस-विजयी उमेदवाराचे नाव- रमेश पुणेकर
प्रभाग क्रमांक 20 ड- पक्ष-भापजपा-विजयी उमेदवाराचे नाव- दीपराज परडीकर