AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

न भूतो न भविष्यती! भाजपचा मोठा गेम, देशात पहिल्यांदाच घडलं असं काही….; नवा निर्णय काय?

नागपूर महानगरपालिकेत भाजपने नवा इतिहास रचला असून महापौर, उपमहापौर आणि स्थायी समितीसह सर्व १४ विषय समित्यांच्या सभापतीपदी महिलांची नियुक्ती करण्यात आली आहे.

न भूतो न भविष्यती! भाजपचा मोठा गेम, देशात पहिल्यांदाच घडलं असं काही....; नवा निर्णय काय?
nagpur municipal corporation
| Updated on: Feb 24, 2026 | 2:42 PM
Share

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपूर शहरात भाजपने एक नवा इतिहास रचला आहे. नागपूर महानगरपालिकेच्या सर्व महत्त्वाच्या पदांवर महिलांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आजपासून नागपूर महानगरपालिकेत पूर्णतः महिलाराज पाहायला मिळणार आहे. राज्यात तसेच देशातही अशाप्रकारे सर्व प्रमुख पदांची सूत्रे महिलांकडे सोपवण्याची ही पहिलीच वेळ असावी, असे म्हटले जात आहे. सध्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

राज्यातील महापालिका निवडणुका पार पडल्यानंतर सर्व शहरात महापौरांची निवड प्रक्रिया पार पडली. यानंतर आता सर्वत्र विविध समितींच्या सभापतींच्या नावांची घोषणा होताना दिसत आहे. आज नागपूर महापालिकेत एक विशेष सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत महापालिकेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतींची घोषणा करण्यात आली. यामध्ये महापौर आणि उपमहापौर पदांनंतर आता स्थायी समिती, परिवहन, आरोग्य आणि शिक्षण अशा सर्वच महत्त्वाच्या समित्यांच्या अध्यक्षांच्या नावांचा समावेश होता.

नागपूर महापालिकेतील या सर्व समितींवर महिला नगरसेविकांची निवड करण्यात आली आहे. मातृशक्तीचा सन्मान या भावनेतून भाजपने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. या ऐतिहासिक निवडीनंतर महापौर नीता ठाकरे आणि नवनियुक्त महिला पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तसेच शहराच्या विकासासाठी आता महिलांची ही टीम सज्ज झाली आहे.

नवनियुक्त महिला पदाधिकाऱ्यांची संपूर्ण यादी

  • महापौर – नीता ठाकरे
  • उपमहापौर – लीला हात्तीबेड
  • स्थायी समिती – शिवानी दाणी
  • परिवहन समिती – मंगला खेकरे
  • स्थापत्य समिती – अश्विनी जिचकार
  • अग्निशमन – मायाताई इवनाते
  • आरोग्य – मनीषा अतकरे
  • विधी – निधी तेलगोटे
  • शिक्षण – संतोषदेवी लड्डा
  • गल्लीच वस्ती निर्मूलन – ऋतिक मसराम
  • क्रीडा – दर्शनी धवड
  • महिला व बालकल्याण – सारिखा नांदुरकर
  • जलप्रदाय – दिव्या धूरडे
  • कर आकारणी – सरिता कावरे

भाजपचा नवा पायंडा

दरम्यान नागपूर महानगरपालिकेच्या या निर्णयामुळे राजकारणातील महिलांचे वर्चस्व दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यातच भाजपने नागपूर महापालिकेच्या चाव्या महिलांच्या हाती सोपवून एक नवा पायंडा पाडला आहे. या ऐतिहासिक बदलामुळे नागपूरच्या नागरी समस्या सोडवण्यात आणि विकास प्रकल्पांना गती देण्यात महिला शक्ती यशस्वी ठरणार का, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

नागपूर महानगरपालिकेच्या एकूण १५१ जागांपैकी भारतीय जनता पक्षाकडे १०८ नगरसेवकांचे स्पष्ट बहुमत आहे. यामुळेच सर्व महत्त्वाच्या पदांवर महिलांची नियुक्ती करणे पक्षाला सहज शक्य झाले आहे. तर प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसकडे २९ जागा आहेत. तसेच बहुजन समाज पक्षाचे १०, शिवसेनेचे २, राष्ट्रवादी काँग्रेसचा १ आणि १ अपक्ष असे पक्षीय बलाबल आहे.

Follow Us
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा टाकताच...
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
Video | माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यूचा थरार! पहा व्हिडीओ
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
CJP Protest | नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
Viral Video | व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
संध्याकाळी 6 वाजता राहुल गांधींची खासदारांसोबत बैठक,
संध्याकाळी 6 वाजता बैठक, पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनानंतर कॉंग्रेसची पुढील रणनीती काय?
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत
Suvrat Joshi | मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा...
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा घेणार लोकसभा अध्यक्षांची भेट
आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
Assam Flood | आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
Viral Video | एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल