थोडी जरी चूक झाली असती तर… खेळता खेळता शेंगदाणा खाल्ला अन् फुफ्फुसातच… नागपुरातील विचित्र घटना

मुलांकडे लक्ष ठेवणं आता फार गरजेचं झालं आहे. कारण नागपुरात असं काही झालं ज्यामुळे चिमुकल्याचे प्राण संकटात आले असते... खेळता खेळता मुलाने शेंगदाणा खाल्ला... पण शेंगदाणा मुलाच्या फुफ्फुसात अडकला, त्यानंतर डॉक्टरांनी जे सांगितलं ते धक्कादायक होतं... सध्या नागपुरातील विचित्र घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

थोडी जरी चूक झाली असती तर... खेळता खेळता शेंगदाणा खाल्ला अन् फुफ्फुसातच... नागपुरातील विचित्र घटना
| Updated on: Jun 13, 2026 | 11:30 AM

नागपुरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. खेळता – खेळता एका तीन वर्षांच्या चिमुकल्याने शेंगदाणा खाल्ला. तो शेंगदाणा मुलच्या फुफ्फुसात अडकला. सुरुवातील काही कळायलाच मार्ग नव्हता. मुलाला सत ताप येत असल्याने पालकांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला. सुरुवातील साधा ताप असेल, असं पालकांना वाटलं. पण मुलगा सतत आजारी पडत असल्याने त्याला नागपूरच्या मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर, सुरुवातीला चिमुकल्याला निमोनिया झाला म्हणून उपचार करण्यात आले. पण उपचारांचा मुलाच्या आरोग्यावर काहीही फरक दिसला नाही. अखेर निमोनियावर उपचार करत असताना एक्स-रे आणि सिटीस्कॅन करण्यात आलं तेव्हा रिपोर्टमध्ये जे समोर आलं, ते पाहिल्यानंतर डॉक्टर देखील चक्राहून गेले.

कारण हा साधारण निमोनिया नसून बालकाच्या उजव्या श्वसननलिकेत काहीतरी बाह्य वस्तू अडकल्याचं समोर आलं होतं. या वस्तूमुळे मुलाचं उजवं फुफ्फुस पूर्णपणे निकामी झालं होतं, या शस्त्रक्रियेत भूल देणं आणि श्वसनलिकेच्या अरुंद मार्गातून शस्त्रक्रिया करणं हे डॉक्टरांसाठी अत्यंत आव्हानात्मक होतं.

थोडी जरी चूक झाली असती तर बालकाचा प्राण गेला असता… अशी माहिती देखील समोर येत आहे. डॉक्टरांनी फायबर ऑप्टिकब्रोंकोस्कोपीद्वारे अडकलेल्या वस्तूच्या अचूक शोध घेऊन रिजीड बोन्कोस्कोपीचा वापर केला. तेव्हा कळलं की मुलाच्या फुफ्फुसात अडकलेली गोष्ट दुसरी तिसरी कोणती नव्हती तर, शेंगदाणा होता. शेंगदाणा बाहेर काढल्यानंतर मुलाच्या पालकांनी समाधान व्यक्त केला.

तब्बल अडीच तास ही शस्त्रक्रिया सुरु होती. अखेर शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि त्या लहानग्याचा कोंडलेला श्वास मोकळा झाला. ऑपरेश झाल्यानंतर जेव्हा मुलाला शुद्ध आली, तेव्हा डॉक्टरांनी देखील मोकळा श्वास घेतला. त्यांच्या चेहऱ्यावर देखील समाधान दिसून आला. तर आई – वडिलांचे डोळे पाण्यात भरले. त्यानंतर मुलाच्या आई – वडिलांनी डॉक्टरांचे पाय धरुन आभार मानले.

मुलाचे प्राण वाचल्यामुळे नातेवाईकांमध्ये देखील आनंदाचं वातावरण आहे. सांगायचं झालं तर घरात लहान मूल असलं की, जीव सतत टांगणीला लागलेला असतो…  त्यांच्याकडे सतत लक्ष करडी नजर ठेवावी लागते. पण अशी कोणती घटना घडल्यानंतर मनात मोठी भीती निर्माण होते.

Follow Us