E20 विरोधात वातावरण तापलं, प्रधान यांच्यानंतर नितीन गडकरी रडारवर; युवक काँग्रेसचा आक्रमक पवित्रा

धर्मेद्र प्रधान यांच्यानंतर आता नितीन गडकरी यांच्याविरोधात वातावरण तापलं आहे. इथेनॉल मिश्रित इंधनावरून गडकरी यांच्या विरोधात युवक काँग्रेसने आंदोलनाचा नारा दिला आहे.

E20 विरोधात वातावरण तापलं, प्रधान यांच्यानंतर नितीन गडकरी रडारवर; युवक काँग्रेसचा आक्रमक पवित्रा
| Updated on: Aug 03, 2026 | 2:42 PM

काही दिवसांपापूर्वी नीट पेपरफुटीवरून धर्मेंद्र प्रधान यांना शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची वेळ आली. प्रधान यांच्या विरोधात कॉक्रोच जनता पार्टीने आक्रमक आंदोलन केल्याने मोदी सरकारला झुकावं लागलं. प्रधान यांच्यानंतर आता युवकांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात एल्गार पुकारण्यात आला आहे. इथेनॉल मिश्रित इंधनावरून युवक काँग्रेसने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा नारा दिला. त्यानंतर नागपूर युवक काँग्रेसने गडकरींच्या घराजवळ जाऊन जनआक्रोश घेराव आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. युवक काँग्रेसच्या या आंदोलनामुळे काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं.

मागील काही दिवसांपासून नीट पेपरपफुटीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पेपरफुटीच्या विरोधात विधेयकाला देखील मंजुरी मिळाली. पेपरफुटीनंतर आता इथेनॉल मिश्रित इंधनाला देशभरातून विरोध पाहायला मिळत आहे. E20 पेट्रोल विरोधात सोशल मीडियावरही जोरदार टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर नागपुरात युवक काँग्रेसने घरासमोर जनआक्रोश मोर्चा काढला. या मोर्चाची सुरुवात दुपारी 1 वाजता चिटणीस पार्क चौकातून झाली. त्यानंतर युवक काँग्रेसच्या नेत्यांनी नितीन गडकरी यांच्या निवासस्थानाकडे कूच केली. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या आंदोलनात गडकरींच्या विरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांच्या हातात अनेक पोस्टर देखील होते. आंदोलकांनी गडकरींच्या निवासस्थानाकडे कूच केल्यानंतर पोलिसांनी तातडीने धरपकड करण्यास सुरुवात केली.

एका आंदोलकाने म्हटलं की, ‘नितीन गडकरी यांच्या राजीनाम्यासाठी युवक काँग्रेसचं आंदोलन होत आहे. नितीन गडकरींनी इथेनॉल मिश्रित इंधनाचा भ्रष्टाचार केला आहे. त्यांनी गोरगरीबांचं नुकसान केलं आहे. अनेकांच्या गाड्या खराब झाल्या आहेत. त्यामुळे नितीन गडकरी यांनी राजीनामा द्यावा. त्यासाठी आमचं आंदोलन आहे.

आंदोलकांची धरपकड

युवक काँग्रेसचे थेट पोलिसांच्या बॅरिकेट्सवर चढले. या आंदोलकांना आक्रमक पवित्रा घेतला आहे. या कार्यकर्त्यांकडून गडकरी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करताना दिसत आहे. युवक काँग्रेसच्य आक्रमक पवित्र्यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस आंदोलकांना नितीन गडकरींच्या घराजवळ जाण्यापासून रोखण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांची धरपकड केली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us