AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

100 टक्के पेट्रोल मिळणार पण त्याकरिता… नितीन गडकरी यांचे मोठे विधान, मोठा दणका..

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी इथेनॉल वापरासाठी आग्रही आहेत. यादरम्यानच त्यांनी आता यावर मोठे विधान केले. नितीन गडकरी यांनी थेट म्हटले की, ज्यांना 100 टक्के पेट्रोल हवे आहे, त्यांना ते मिळेल.

100 टक्के पेट्रोल मिळणार पण त्याकरिता... नितीन गडकरी यांचे मोठे विधान, मोठा दणका..
Nitin Gadkari
| Updated on: Jul 15, 2026 | 11:27 AM
Share

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 100 टक्के इथेनॉलला हिरवा कंदील दाखवला. केंद्र सरकारकडून मोठा आदेशही इथेनॉलबाबत काढण्यात आला. भारत पेट्रोल-डिझेलकरिता खाडी देशांवर अवलंबून आहे. इराण आणि अमेरिका युद्धात कच्च्या तेलाची मोठी समस्या आहे. ज्यामुळे इथेनॉल वापराबाबत सरकारने काही मोठे निर्णय घेतले. नितीन गडकरी यांच्या इथेनॉल वापराला काही जणांकडून कडाडून विरोध केला जात आहे. हेच नाही तर याच मुद्द्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनीही नितीन गडकरी यांच्यावर निशाणा साधला. पेट्रोल आणि डिझेलसाठी भारताला दरवर्षी किती रूपये मोजावे लागतात, याबाबत त्यांनी थेट आकडेवारीच जाहीर केली. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या वाढणाऱ्या किमतीवर भाष्य करत गडकरी यांनी म्हटले की, इथेनॉलच्या किमती केंद्र सरकार ठरणार आहे.

यादरम्यानच आता इथेनॉलचा विरोध करणाऱ्यांना खडेबोल नितीन गडकरी यांच्याकडून सुनावण्यात आले. नितीन गडकरी यांनी म्हटले की, जर लोकांना हवे असेल तर ते 100 टक्के पेट्रोलही घेऊ शकतात. पण याकरिता त्यांना जास्त पैसे मोजावे लागतील. टाईम्स ऑफ इंडियासोबत बोलताना नितीन गडकरी यांनी म्हटले की, 20 टक्के इथेनॉल ब्लॅडिंगचे टार्गेट यशस्वी झाले.

E20 इंधन आज पूर्ण देशात उपलब्ध आहे. जर लोकांना इथेनॉल मिक्स पेट्रोल नको असेल तर त्यांना 100 टक्के असलेले पेट्रोलही मिळेल. पण त्यांना याकरिता पैसे अधिकचे मोजावे लागतील. IIT कानपूरचे म्हणणे आहे की, E20 इंधनाने चालणाऱ्या कोणत्याही गाड्यांना काहीही समस्या आली नाही. हेच नाही तर E20 इंधनावर चालणाऱ्या गाड्यांना मायलेजचा काही प्रॉब्लेम आला नाही.

संशोधनकरित्यांनी स्पष्ट केले की, E20 वर चालणाऱ्या गाड्यांना कोणत्याही प्रकारची समस्या आली नाही. यासोबतच नितीन गडकरी यांनी E20 वर चालणाऱ्या गाड्यांना काही समस्या असेल तर कळवण्याचे आवाहनही केले होते. मात्र, एकही तक्रार प्राप्त झाली नसल्याचे गडकरींनी म्हटले.  नितीन गडकरी इथेनॉलच्या वापरासाठी आग्रही आहेत. यादरम्यानच त्यांच्यावर काही आरोपही करण्यात आली.

Follow Us
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदत
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
मुंबई महापालिकेकडून शालेय साहित्य वाटपास विलंब: इराण युद्ध कारणीभूत
मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
शिल्पा गवारे कुटुंबीयांकडून छळाचा आरोप, न्यायची मागणी
पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण: पती, सासू-सासरे आणि दिराला पोलीस कोठडी
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
दिशा सालियान प्रकरणाची मुंबई हाटकोर्टात सुनावणी पार
Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणाची मुंबई हाटकोर्टात सुनावणी, काय सुनावणी घडलं?
नेपाळ पुराचा बिहारला फटका: पाटणा, चंपारण, गोपाळगंज, सारणमध्ये सतर्कता
नेपाळमधील महापुराचा बिहारला फटका: गंगा नदीकाठच्या झोपड्या पाण्याखाली
धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की... श्रावण महिन्यात मांसाहार
धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की... श्रावण महिन्यात मांसाहार मागणाऱ्या लेकाला पालकांनीच संपवलं
यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात
यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात; सांस्कृतिक सोहळ्यांमध्ये सहभाग
MPSC पेपरफुटी प्रकरणावर फडणवीसांचा मोठा निर्णय, दोषींवर कठोर...
MPSC पेपरफुटी प्रकरणावर फडणवीसांचा मोठा निर्णय, दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश