AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कॅबिनेट मंत्रिमंडळात थेट होणार बदल? नितिन गडकरी यांच्यावर नवी जबाबदारी कोणती? थेट..

केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे बदल होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. तश्या हालचालीही सुरू आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळात काही नव्या चेहऱ्यांचा समावेश होईल तर काहींना थेट नारळ दिले जाणार आहे. राज्यातील काही खासदारांना थेट केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळणार आहे.

कॅबिनेट मंत्रिमंडळात थेट होणार बदल? नितिन गडकरी यांच्यावर नवी जबाबदारी कोणती? थेट..
Narendra Modi Union Cabinet
| Updated on: Jul 03, 2026 | 1:49 PM
Share

नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेटमध्ये मोठे बदल होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सतत रंगताना दिसत आहे. काहींना थेट कॅबिनेटमधून बाहेरचा रस्ता दाखवला जाईल तर काहींना संधी मिळेल. राज्यातील एका बड्या केंद्रीय नेत्यावर नरेंद्र मोदी महत्वाची जबाबदारी सोपवणार असल्याचे कळतंय. यासोबतच शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी करत थेट शिवसेना शिंदे गटात गेलेल्या 6 खासदारांपैकी दोन जणांवर मोठी जबाबदारी असणार आहे. श्रीकांत शिंदे, ओमराजे निंबाळकर आणि संजय जाधव यांच्या गळ्यात थेट केंद्रीय मंत्रीपदाची माळ पडणार असल्याची चर्चा आहे. नुकताच एकनाथ शिंदे दिल्ली दाैऱ्यावरही गेले होते. नावे फायनल झाल्याचे कळतंय. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठी जबाबदारी देऊ शकतात, असे सांगितले जातंय.

थोडक्यात काय तर नितिन गडकरी यांची पदोन्नती होण्याचे संकेत आहेत. 18 जुलैला मॉन्सूनचे सत्र लोकसभेत सुरू होईल, त्यापूर्वीच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराबद्दल मोठी घोषणा केली जाईल. काहींना थेट नारळ दिले जाण्याची चर्चा आहे. नवीन चेहरे नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेटमध्ये बघायला मिळतील. आम आदमी पार्टीतून बंडखोरी करत भाजपात दाखल झालेल्या राघव चड्डा यांनाही नरेंद्र मोदी मोठी जबाबदारी देऊ शकतात.

निर्मला सीतारमण यांना नवीन जबाबदारी नरेंद्र मोदी देऊ शकतात. मात्र, अजूनही काही गोष्टी स्पष्ट नाहीत. सर्व निर्णय झाले असून फक्त घोषणाच बाकी असल्याचे बोलले जातंय. कॅबिनेटच्या बदलातील चर्चांमध्येच नितिन नवीन यांनी नुकताच अमित शाह यांची भेट घेतली. दिल्लीमध्ये याबाबत मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत.

केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यातील नक्की किती जणांना संधी मिळते, हे पाहण्यासारखे ठरणार आहे. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना नवीन जबाबदारी नरेंद्र मोदी नक्की काय देतील, हे देखील पाहणे महत्वाचे ठरेल. श्रीकांत शिंदे यांच्याकडेही महत्वाचे खाते असणार आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडे कोणत्याही खात्याची जबाबदारी राहते, हे देखील स्पष्टच होईलच. एकनाथ शिंदे पुन्हा एकदा दिल्ली दाैऱ्यावर जाऊ शकतात.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ