Nagpur Ganesha : नागपूरच्या टेकडीवर बसलेले बाप्पा, जाणून घ्या काय आहे पौराणिक महत्त्व…

सचिन तेंदुलकर टेकडीच्या गणपतीचं दर्शन केल्याशिवाय जात नाहीत. दर्शन घेतलं नाही तर मॅच हरत असल्याचं सांगितलं जातं. दर्शनानं सर्व कामं विघ्न न येता पूर्ण होतात, अशी मान्यता आहे.

Nagpur Ganesha : नागपूरच्या टेकडीवर बसलेले बाप्पा, जाणून घ्या काय आहे पौराणिक महत्त्व...
नागपूरच्या टेकडीवर बसलेले बाप्पाImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Sep 08, 2022 | 2:08 PM

नागपूरचे टेकडी गणेश (Hill Ganesha) मंदिर भगवान गणेश यांना समर्पित आहे. हजारो भाविक गणपतीची (Ganapati) पूजा करतात. टेकडी मंदिराची प्रतीमा स्वयंभू आहे. किती वर्षांपासूनची ही मूर्ती आहे, याची माहिती स्पष्टपणे कोणी सांगत नाहीत. परंतु, दोनशे ते अडीचशे वर्षांपासून भाविक येथे गणपतीची पूजा करतात. स्वयंभू गणपती पिंपळाच्या झाडाखाली विराजमान झाले आहेत. अशाप्रकारचा एकमेव गणपती असल्याचा दावा स्थानिक पूजारी करतात. अगस्त मुनी (Agast Muni) यांनी टेकडी गणपतीचा उल्लेख केलाय. तो हाच गणपती असल्याचं समजलं जातं. येथे उंच भाग असल्यानं या गणपतीला टेकडी गणेश असं नाव देण्यात आलं.

सचिन तेंदुलकर घेतात दर्शन

इंग्रजांच्या काळात रेल्वेची लाईन टाकली जात होती. तेव्हा ही टेकडी तोडली जात होती. तेव्हा पिंपळाच्या झाडाखाली गणपतीची मूर्ती असल्याचं दिसलं. त्यामुळं तिथं पूजा अर्चना सुरु झाली. त्यानंतर लोकांची आस्था वाढत गेली. 1866 मध्ये मध्ये रेल्वेचं काम सुरू होतं. खोदकामादरम्यान काही शिलालेख सापडलेत. त्या शिलालेखावर राजा विक्रमादित्य यांचा उल्लेख होता. विक्रमादित्य यांनी ही जमीन गोचरसाठी (गायी चराईसाठी) दान दिली होती. तेव्हाचं गणपती यांची सिंदूर लावलेली मूर्ती सापडली. यावरून येथे आधीपासून मंदिर असल्याचं स्पष्ट होतंय. सचिन तेंदुलकर गणपतीचं दर्शन केल्याशिवाय जात नाहीत. दर्शन घेतलं नाही तर मॅच हरत असल्याचं सांगितलं जातं. दर्शनानं सर्व कामं विघ्न न येता पूर्ण होतात, अशी मान्यता आहे.

बाप्पा झाले लेखनिक

गणेश शब्दाचा अर्थ गणांचा ईश वा प्रभू असा आहे. गण म्हणजे शिव आणि पार्वतीचा सेवक होय. परशूरामानं युद्धात गणपतीचा एक दात उपटला. म्हणून एकदंत.. लंबोदर म्हणजे मोठे उदर. गणपतीचा प्रथम उल्लेख ऋग्वेदात आढळतो. महाभारतात कौरव व पांडव यांच्या मृत्यूनंतर व्यास ध्यानास बसले. महाभारताच्या घटना आठवू लागले. त्यांना लेखनिकाची गरज होती. तेव्हा गणपती स्वतः लेखनिक झाले.

हे सुद्धा वाचा

'तरूणांना वाटतं ही पहिलीच संधी अन् वयस्करांना...', अजित पवारांचा टोला
'तरूणांना वाटतं ही पहिलीच संधी अन् वयस्करांना...', अजित पवारांचा टोला.
विधानसभेत महायुती आणि मविआला नेमक्या किती जागा? लोकपोलचा सर्व्हे काय?
विधानसभेत महायुती आणि मविआला नेमक्या किती जागा? लोकपोलचा सर्व्हे काय?.
विरोधकांवर टीका करणाऱ्या अमोल मिटकरींमधला गायक पाहिलाय का? बघा VIDEO
विरोधकांवर टीका करणाऱ्या अमोल मिटकरींमधला गायक पाहिलाय का? बघा VIDEO.
'बिहार पॅटर्न राबवा, मला CM पद द्या...', शाहांसमोर दादांचा प्रस्ताव?
'बिहार पॅटर्न राबवा, मला CM पद द्या...', शाहांसमोर दादांचा प्रस्ताव?.
लाडकी बहीण नेमकी कोणाची? योजनेच्या श्रेयवादावर अजित दादा स्पष्टच बोलले
लाडकी बहीण नेमकी कोणाची? योजनेच्या श्रेयवादावर अजित दादा स्पष्टच बोलले.
'देवा भाऊं'चे झळकले बॅनर, 'लाडकी बहीण'च्या बॅनरवरून दादांचा फोटो गायब
'देवा भाऊं'चे झळकले बॅनर, 'लाडकी बहीण'च्या बॅनरवरून दादांचा फोटो गायब.
भुजबळांनी दिलेल्या चॅलेंजवर जरांगे यांचा पलटवार; म्हणाले, १ लाख काय...
भुजबळांनी दिलेल्या चॅलेंजवर जरांगे यांचा पलटवार; म्हणाले, १ लाख काय....
त्यांनीच माझा भाजप प्रवेश रोखला; खडसेंनी घेतली 'या' दोन नेत्यांची नावं
त्यांनीच माझा भाजप प्रवेश रोखला; खडसेंनी घेतली 'या' दोन नेत्यांची नावं.
शिवरायांचं राज्य तेव्हा किती होतं?, मोहन भागवत यांनी काय दिला दाखला?
शिवरायांचं राज्य तेव्हा किती होतं?, मोहन भागवत यांनी काय दिला दाखला?.
सोमय्या सक्रिय होणार, विधानसभेच्या तोंडावर पक्षाकडून मोठी जबाबदारी
सोमय्या सक्रिय होणार, विधानसभेच्या तोंडावर पक्षाकडून मोठी जबाबदारी.