Bhandara Court : अल्पवयीन मुलीला पळवून नेलं, आरोपीस 10 वर्षे कारावास, भंडारा जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल

आरोपी प्रशांत खोब्रागडे याला अटक करण्यात आली. तपासाअंती प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय तथा विशेष न्यायालय भंडारा येथे आरोपी विरुध्द आरोपपत्र दाखल करण्यात आले.

Bhandara Court : अल्पवयीन मुलीला पळवून नेलं, आरोपीस 10 वर्षे कारावास, भंडारा जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल
अल्पवयीन मुलीला पळवून नेलं, आरोपीस 10 वर्षे कारावासImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Sep 07, 2022 | 4:14 PM

भंडारा जिल्ह्याच्या साकोली पोलीस स्टेशन अंतर्गत शिरेगाव बांध येतो. शिरेगाव बांध येथील एका 28 वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलीला पळवून नेले ( girl kidnapped) होते. आरोप सिध्द झाल्याने अतिरिक्त व सत्र न्यायाधीश पी. बी. तिजारे यांनी आरोपीला दहा वर्षे कारावासाची शिक्षा (Imprisonment) सुनावली. प्रशांत खोब्रागडे (Prashant Khobragade) असं आरोपीचं नाव आहे.ही घटना 3 ऑगस्ट 2016 रोजी घडली. अल्पवयीन मुलगी घरी दिसली नाही. मुलगी कुठे गेली म्हणून नातेवाईकाकडे तसेच तिच्या मित्र-मैत्रिणींकडे विचारपूस करण्यात आली. मात्र मुलगी दिसून आली नाही. अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचे लक्षात आले. साकोली पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदविण्यात आली. या तक्रारीवरुन प्रशांत खोब्रागडे याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

दंड न भरल्यास शिक्षेत होणार वाढ

सदर गुन्ह्याचा तपास साकोली पोलिसांनी केला. आरोपी प्रशांत खोब्रागडे याला अटक करण्यात आली. तपासाअंती प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय तथा विशेष न्यायालय भंडारा येथे आरोपी विरुध्द आरोपपत्र दाखल करण्यात आले. या गुन्ह्याची सुनावणी अतिरिक्त व सत्र न्यायाधीश पी. बी. तिजारे यांच्या न्यायालयात झाली. न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकला. साक्षीदार तपासले. आरोपी प्रशांत खोब्रागडे याच्याविरुध्द अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेण्याचे आरोप सिध्द झाला. आरोपीला दहा वर्षे सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. दंड न भरल्यास तीन महिने साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. अल्पवयीन मुलींना पळवून नेणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळं प्रशांतला आता पुढील दहा वर्षे कारागृहात काढावी लागणार आहेत. झालेल्या घटनेबद्दल पश्चाताप केल्याशिवाय त्याच्याकडं काही उरलं नाही.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.