भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी ई-लायब्ररीचे आज लोकार्पण, प्रज्ञावंत विद्यार्थी घडविण्यासाठी नागपूर मनपा सज्ज

| Updated on: Mar 03, 2022 | 7:05 AM

ब्रिटीश ई-लायब्ररीच्या आधारावर या ई-लायब्ररीची संकल्पना तयार करण्यात आली आहे. लायब्ररीची इमारत तीन मजली असून संपूर्ण इमारत वातानुकूलित आहे. संपूर्ण परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीत आहे. इमारतीच्या तळमजल्यावर पार्किंगची व्यवस्था, प्रशस्त सभागृह आहे.

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी ई-लायब्ररीचे आज लोकार्पण, प्रज्ञावंत विद्यार्थी घडविण्यासाठी नागपूर मनपा सज्ज
नागपुरातील ई लायब्ररीबद्दल माहिती देताना महापौर दयाशंकर तिवारी व इतर.
Image Credit source: tv 9
Follow us on

नागपूर : नागपूर शहराचा रस्ते, उद्याने यापुढे चौफेर विकास व्हावा. त्यात शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्राचाही समावेश असावा. यासाठी मनपाद्वारे अत्याधुनिक ई-लायब्ररी साकार करण्यात आली आहे. गीतांजली चौक, गांधीबाग येथे नागपूर महापालिकेद्वारे सुसज्ज, अत्याधुनिक, अद्ययावत ई-लायब्ररी तयार झालीय. येथील विद्यार्थ्यांना अभ्यासाची, स्पर्धेची गोडी लागावी ही संकल्पना आहे. ई-लायब्ररीला माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाचा लाभ घेता यावा आणि भविष्यात भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारखे प्रज्ञावंत विद्यार्थी या लायब्ररीतून घडावे हा यामागचा उद्देश आहे. गुरुवार तीन मार्च सायंकाळी साडेसात वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांच्या हस्ते भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी ई-लायब्ररीचे (Bharat Ratna Atal Bihari Vajpayee E-Library) लोकार्पण होणार आहे. या वास्तुचे आर्किटेक्ट प्रशांत सातपुते ( Architect Prashant Satpute) आहे.

ई-लायब्ररीचे ठळक वैशिष्ट्ये

  1. एकूण भूखंड : 912.063 वर्ग मीटर (9817 वर्ग फूट)
    बांधकाम क्षेत्र : 629.444 वर्ग मीटर (6775 वर्ग फूट)
    प्रस्तावित खर्च : बांधकाम – 3,82,78,285 रुपये, इंटेरियर कार्य – 2,37,97,437 रुपये, एकूण : 6,20,75,722 रुपये
  2. तळमजला
    पार्किंग, प्रसाधनगृह, दिव्यांगांसाठी विशेष प्रसाधनगृह
    पहिला माळा
    74 क्षमतेचे सभागृह (वातानुकूलित, प्रोजेक्टर, ऑडिओ सिस्टीम)
    सादरीकरण कक्ष (प्रेझेंटेशन रूम) : क्षमता 30 (वातानुकूलित, प्रोजेक्टर)
  3. दुसरा माळा
    लायब्ररी : कोहा (KOHA) सॉफ्टवेअरद्वारे लायब्ररीचे संचालन, बुक शेल्फ, आरएफआयडी सुरक्षा गेट, सेल्फ बुक इशू किऑस्क, सेल्फ बुक डिपॉझिट किऑस्क. सर्व पुस्तकांना आयएफआयडी स्टिकर्स, पुस्तक पीडीएफमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी बुक स्कॅनर.
    वाचन कक्ष (क्षमता 10)
    दिव्यांगांसाठी वाचन कक्ष : अंध वि‌द्यार्थ्यांसाठी JAWS रिडिंग सॉफ्टवेअर, अंधांसाठी टाईपबिलिटी टॉकिंग पीसी कीबोर्ड, मराठी बुक रिडर सॉफ्टवेअर, ब्रेल लिपीतील प्रिंटर, आंशिक अंधांसाठी मर्लिन डेस्कटॉप व्हिडिओ मॅग्निफायर सिस्टीम, अंधांसाठी SARA मजकूर वाचन मशीन.
    वि‌द्यार्थ्यांसाठी लॉकर रूम
  4. तिसरा माळा
    संगणक कक्ष (मुले) : क्षमता 22
    संगणक कक्ष (मुली) : क्षमता 22
    कॉमन संगणक कक्ष : क्षमता 22
    (वातानुकूलित, इंटरनेट सुविधेसह)
  5. चवथा माळा
    कॅफेटेरिया
    इमारतीमधील सुविधा
    सर्व माळ्यांना लिफ्ट सुविधा : कोणत्याही माळ्यावर दिव्यांगांना सहज जाता येणार
    सर्व माळ्यांवर वातानुकूलित व्यवस्था
    प्रशस्त वाचन आणि संगणक कक्ष
    सर्व माळ्यांवर अग्निशमन यंत्रणा
    संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था