Vidarbha ShivSena : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नागपूर आणि अमरावतीत लवकरच दौरे, शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची विदर्भातील जिल्हानिहाय यादी जाहीर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या यूती एकत्र येऊन लढणार आहे. यानिमित्तचं मुख्यमंत्री स्वतः विदर्भाचा दौरा करणार आहेत. पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात एकनाथ शिंदे मेळावा घेणार आहेत. नागपूर आणि अमरावतीत एकनाथ शिंदे मेळावे घेणार आहेत.

Vidarbha ShivSena : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नागपूर आणि अमरावतीत लवकरच दौरे, शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची विदर्भातील जिल्हानिहाय यादी जाहीर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नवरात्रात विदर्भ दौरा
| Edited By: | Updated on: Sep 06, 2022 | 3:32 PM

नागपूर : शिंदे गटात गेलेले शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने विदर्भात (Vidarbha) अॅक्टिव्ह झालेत. शिंदे गटानं विदर्भात मिशन विदर्भ सुरू केलंय. लवकरच म्हणजे येत्या नवरात्रात मुख्यमंत्री शिंदे स्वतः विदर्भ दौऱ्यावर येणार आहे. शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांच्या पंखात बळ देणार आहेत. नवरात्रात नागपूर आणि अमरावती (Nagpur and Amravati) येथे दोन मेळावे मुख्यमंत्री शिंदे घेणार आहे, अशी माहिती खासदार कृपाल तुमाने (Kripal Tumane) यांनी दिली. लवकरच नागपूर, अमरावती, चंद्रपूर व अकोला येथील महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. याकडं आतापासून शिंदे गटानं लक्ष दिलंय. कार्यकर्त्यांमध्ये प्राण फुंकण्यासाठी खुद्द एकनाथ शिंदे हे विदर्भात येत असल्याची माहिती तुमाने यांनी नागपुरात आज पत्रकार परिषद घेऊन दिली.


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका युतीत

पत्रकार परिषदेत खासदार कृपाल तुमाने म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या यूती एकत्र येऊन लढणार आहे. यानिमित्तचं मुख्यमंत्री स्वतः विदर्भाचा दौरा करणार आहेत. पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात एकनाथ शिंदे मेळावा घेणार आहेत. नागपूर आणि अमरावतीत एकनाथ शिंदे मेळावे घेणार आहेत. यावेळी शिवसेनेचे शिंदे गटाचे शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

शिंदे गटातील विदर्भातील महत्त्वाचे पदाधिकारी कोण?

किरण पांडव यानी विदर्भातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या. त्यामध्ये नागपूर जिल्हा संपर्कप्रमुख मंगेश काशिकर, संदीप इटकीलवार हे जिल्हा प्रमुख, अजय बालपांडे हे नरखेडचे शहरप्रमुख राहतील. पुरुषोत्तम घोटे हे काटोल विधानसभा क्षेत्राचे उपजिल्हाप्रमुख उपजिल्हाप्रमुख राहतील. रितेश हेलोंडे हे काटोल विधानसभा संघटक म्हणून काम पाहणार आहेत, तर मिलिंद देशमुख हे जिल्हा संघटक म्हणून काम पाहतील. चंद्रपूर जिल्ह्यात सहसंपर्क प्रमुख बंडूभाऊ हजारे, तर जिल्हाप्रमुख म्हणून नितीन मते काम पाहतील. गडचिरोली जिल्ह्यात संदीप बरडे हे संपर्कप्रमुख, हेमंत जंभेवार हे सहसंपर्क प्रमुख, भरत जोशी हे सहसंपर्क प्रमुख, पौर्णिमा इस्टाम या महिला संघटिका, अमिता मडावी या महिला संघटिका, राजगोपाल सुलावार हे जिल्हा संघटक, पप्पी पठाण हे तालुकाप्रमुख तालुका चामोर्शी तर गौरव बाला हे तालुकाप्रमुख मुलचेरा म्हणून काम करणार आहेत. भंडारा जिल्ह्यात अनिल गायधने हे जिल्हा प्रमुख म्हणून काम करतील. गोंदिया जिल्ह्यात मुकेश शिवहरे हे जिल्हा प्रमुख सुरेंद्र नायडू हे जिल्हा प्रमुख म्हणून काम करतील. वर्धा जिल्ह्यात गणेश ईखार हे जिल्हा प्रमुख, संदीप इंगळे हे जिल्हा संघटक, तर राजेश सराफ हे सहसंपर्क प्रमुख म्हणून नियुक्त झाले आहेत. उर्वरित पदाधिकाऱ्यांची लवकरच नियुक्ती केली जाईल. विदर्भात शिंदे गट सक्रिय होणार आहे. यासाठी पदाधिकारी कामाला लागल्याचं कृपाल तुमाने यांनी सांगितलं.