स्मशानभूमीत वेटिंग, सरपणाची टंचाई; नागपुरात ‘दहनपेटी’तून होताहेत मृतदेहांवर अंत्यसंस्कार

राज्यासह देशात कोरोना विषाणूचा धोका दिवसेंदिवस गडद होत चालला आहे (DahanPeti). कोरोना रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे तर दुसरीकडे कोरोना मृत्यूचा आकडाही काही कमी नाही.

स्मशानभूमीत वेटिंग, सरपणाची टंचाई; नागपुरात 'दहनपेटी'तून होताहेत मृतदेहांवर अंत्यसंस्कार
Nagpur Cremation
Follow us
| Updated on: May 08, 2021 | 1:37 PM

नागपूर : राज्यासह देशात कोरोना विषाणूचा धोका दिवसेंदिवस गडद होत चालला आहे (DahanPeti). कोरोना रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे तर दुसरीकडे कोरोना मृत्यूचा आकडाही काही कमी नाही. वाढत्या कोरोना मृत्यूने आता स्मशानभूमीतही वेटिंग आहे. कधीही नसेल बघितलं तशी भयावह स्थिती सध्या देशात आहे (Cremation Is Done Through DahanPeti In Nagpur To Solve The Issue Of Waiting At Cemetery).

नागपुरात दररोज जवळपास 80 पेक्षा जास्त जणांचा कोरोनाने मृत्यू होत आहे. मृत्यूसंख्या वाढल्याने स्मशानात लाकडांचा तुटवडा झाला आहे.

दहन पेटी

दहन पेटी

स्मशानभूमीतील वेटिंगवर ‘दहन पेटी’चा उपाय

नागपूरात कोरोनाची भयावह स्थिती आहे, वाढत्या मृत्यूसंख्येमुळे शहरातील काही स्मशानभूमीत अत्यंसस्कारासाठी 5 ते 10 तासांचं वेटिंग आहे. यावर उपाय म्हणून लवकरात लवकर प्रेतांचं दहन व्हावं, म्हणून केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या कापूस संशोधन केंद्रानं ‘दहन पेटी’ संशोधीत केलीय.

ICR च्या संसोधनानुसार नागपुरातील विदर्भ सेल्स कंपनीने ही दहन पेटी तयार केलीय. गोवऱ्या आणि कपाशीपासून तयार केलेल्या ब्रिकेट्सच्या माध्यमातून दहन प्रकिया केली जाणार आहे. यामुळे लाकडांची बचत होणार आहे. पारंपरिक पद्धतीनं अंत्यविधी केल्यास 10 तासांचा वेळ लागतो. पण, दहन पेटीमुळे निम्मा वेळ वाचणार आहे. शिवाय खर्चातंही बचत होणार आहे.

नागपूर महानगर पालिकेने अंबाझरी घाटावर ही दहन पेटी लावण्यात आलीये. यामुळे स्मशानभूमीतील वेटिंग कमी होण्यास मदत झाली आहे.

दहन पेटी

दहन पेटी

राज्यात कोरोना बळींची संख्या वाढल्याने अनेक शहरात स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी वेटिंगवर रहावं लागतंय. अशा परीस्थितीत या दहन पेटीमुळे स्मशानातील वेटिंगपासून सुटका होऊ शकते, असा विश्वास संशोधक व्यक्त करतायत.

नागपुरातील कोरोना स्थिती

गेल्या 24 तासांत 6,526 रुग्णांनी कोरोनावर मात

4,306 नवीन कोरोना रुग्णांनाची नोंद

तर 79 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

एकूण रुग्ण संख्या – 4,42,144

एकूण बरं होणाऱ्यांची संख्या – 3,71,858

एकूण मृत्यू संख्या – 7,988

देशात कोरोना रुग्णांचा उद्रेक

गेल्या 24 तासांत भारतात कोरोनाचे 4,01,078 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. गेल्या 24 तासांत कोव्हिडमुळे 4,187 जणांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, जर आपण बरे होणाऱ्यांची सख्या बघितली तर भारतात आतापर्यंत 3,18,609 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

Cremation Is Done Through DahanPeti In Nagpur To Solve The Issue Of Waiting At Cemetery

संबंधित बातम्या :

कोरोनामुळे फक्त फुफ्फुसांनाच धोका नव्हे, तर रक्ताच्याही गुठळ्या होण्याची भीती

आभाळच फाटले! एकापाठोपाठ तीन भावांचा कोरोनामुळे मृत्यू; पुण्यात हळहळ

‘त्याला लहान मुलं आहेत, त्याच्यावर आधी उपचार करा’; 60 वर्षांच्या महिलेने तरुणासाठी बेड सोडला

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.