आभाळच फाटले! एकापाठोपाठ तीन भावांचा कोरोनामुळे मृत्यू; पुण्यात हळहळ

शिरुर येथील एका कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. (Death due to COVID-19 in Three Brothers in pune)

आभाळच फाटले! एकापाठोपाठ तीन भावांचा कोरोनामुळे मृत्यू; पुण्यात हळहळ
प्रातिनिधिक छायाचित्रं

पुणे: शिरुर येथील एका कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या कुटुंबातील तीन भावांचा अवघ्या 15 दिवसात कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे संपूर्ण पंचक्रोशीत एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. (Death due to COVID-19 in Three Brothers in pune)

शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे ही दुर्देवी घटना घडली. पोपट धोंडिबा नवले (वय 58) यांचा 15 एप्रिल रोजी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आणि उपचारादरम्यान 23 एप्रिल रोजी त्यांचं निधन झालं. त्यांनतर अवघ्या चार दिवसांनी 27 एप्रिल रोजी त्यांचा दुसरा भाऊ सुभाष धोंडिबा नवले (वय 55) यांच्यावर काळाने झडप घातली आणि 6 मे रोजी त्यांचा तिसरा भाऊ विलास धोंडिबा नवले (वय 52) यांचे निधन झाले. अवघ्या 15 दिवसातच एकाच कुटुंबातील तीन कर्तेधर्ते पुरुष सोडून गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. शिरूर तालुक्यात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. आरोग्य यंत्रणा कमी पडू लागल्याने वेळीच उपचार न मिळाल्याने रुग्णांचे मृत्यू होत आहेत.

पुण्यात कंटेन्मेंट झोनची संख्या घटली

दरम्यान, पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. पुण्यातील 500 वर गेलेली मायक्रो कंन्टेमेंट झोनची संख्या दहा दिवसात घटली आहे. शहरात रुग्णसंख्येत घट झाल्यानं मायक्रो कंन्टेमेंटची संख्या 178 नी घटली आहे. ही संख्या दहा दिवसात 497 वरून थेट 312 वर आली आहे. मात्र, असे असले तरीही पुणेकरांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. 5 पेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून पालिका जाहीर करते. पुण्यात सध्या हडपसर, मुंढवा, धनकवडी कोरोनाचे हॉटस्पॉट आहेत. हडपसरमध्ये 62 तर धनकवडीत 54 मायक्रो कंन्टेमेंट झोन आहेत.

पालिका अॅलर्ट

तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता पुणे महापालिका अलर्ट मोडवर आली आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा धोका असल्याने पुण्यात देशातलं पहिलं चाईल्ड कोव्हीड केअर हॉस्पिटल उभारलं जाणार आहे. येरवड्यातील राजीव गांधी रुग्णालयात चाईल्ड केअर सेंटर उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 200 ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे. या हॉस्पिटलसाठी चार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. दीड महिन्यात हॉस्पिटलचं काम करणार पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली. तिसऱ्या लाटेत मुलांना संसर्ग अधिक होण्याचा धोका लक्षात घेऊन चाईल्ड हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यात 54 हजार नवे रुग्ण

राज्यात गेल्या 24 तासांत 54022 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व नवीन 37386 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 4265326 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 654788 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 85.36% झाले आहे. (Death due to COVID-19 in Three Brothers in pune)

 

संबंधित बातम्या:

Maharashtra Coronavirus LIVE Update : भिवंडीत आज फक्त एकच लसीकरण केंद्रावर लसीकरण, दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्य

Corona Vaccine | देशभरात 16 कोटी 71 लाख लाभार्थ्यांना कोरोना लस, कोणत्या वयोगटातील नागरिकांना कितपत लाभ?

कोरोनाचा लहान मुलांना विळखा, पुण्यासह ठाणे, नागपुरात चाईल्ड कोव्हिड सेंटर उभारणार

(Death due to COVID-19 in Three Brothers in pune)