AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘त्याला लहान मुलं आहेत, त्याच्यावर आधी उपचार करा’; 60 वर्षांच्या महिलेने तरुणासाठी बेड सोडला

देशभरात एकीकडे कोरोना काळात लोकांना माणुसकीचा विसर पडत आहे. तर दुसरीकडे या कठीण काळातही माणुसकी जपली जात आहे. (Rajasthan old lady vacates hospital bed for young covid patient)

'त्याला लहान मुलं आहेत, त्याच्यावर आधी उपचार करा'; 60 वर्षांच्या महिलेने तरुणासाठी बेड सोडला
rajsthan
| Updated on: May 08, 2021 | 10:42 AM
Share

जयपूर : देशभरात एकीकडे कोरोना काळात लोकांना माणुसकीचा विसर पडत आहे. तर दुसरीकडे या कठीण काळातही माणुसकी जपली जात आहे. राजस्थानमध्ये एका तरुणाला बेड मिळावा, यासाठी एका वृद्ध महिलेने तिचा बेड सोडल्याची घटना घडली. ही महिला स्वत: ऑक्सिजनद्वारे श्वास घेत आहे. मात्र तो तरुण कोरोनाग्रस्त असून त्याची तब्येत फार जास्त आहे. विशेष म्हणजे ती महिला व्हेलचेअरवर बसून बेड मिळण्याची वाट पाहात आहे. तर त्या तरुणावर सध्या उपचार सुरु आहे. (Rajasthan 60 year old lady vacates hospital bed for young covid patient)

नेमकं काय घडलं? 

राजस्थान हा देश शूर आणि दयाळू मानला जात आहे. राजस्थानातील पालीत एक राणा नावाचे गाव आहे. या गावात 60 वर्षीय लेहर कंवर राहतात. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांना श्वास घेण्यास अडचणी येत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्या ठिकाणी बेड उपलब्ध नव्हता. जवळपास चार तास ओपीडीच्या व्हिलचेअरवर थांबल्यानंतर लेहर यांना बेड मिळाला.

पण तेवढ्यात त्यांची नजर एका तरुणाकडे गेले. एका गाडीमध्ये बसलेले 40 वर्षीय बाबूराम यांनाही कोरोनाची लागण झाली होती. ते गंभीर अवस्थेत असून त्यांचा जीवन-मृत्यूशी लढा सुरु होतो. बाबूराव यांना गंभीर अवस्थेत बघून लेहर यांना पाझर फुटला. त्यांनी डॉक्टरांना संपर्क साधत स्वत:चा बेड त्यांना द्या, असे सांगितले.

“मी आयुष्य बघितलं, माझा बेड त्यांना द्या”

मी माझे आयुष्य पाहिले आहे. माझी मुले देखील विवाहित आहेत. पण त्यांना लहान मुले आहेत. त्यामुळे आधी त्यांच्यावर उपचार करा. माझा बेड सध्या त्यांना द्या. मी अजून काही काळ व्हिलचेअरवर थांबू शकते, असे लेहर म्हणाल्या. विशेष म्हणजे लेहर यांनी बाबूराम यांना बेड देण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्यांची ऑक्सिजनची पातळी ही 43 वर होती. त्यामुळे जर त्यांना वेळेत उपचार मिळाले नसते तर त्यांचा जीव वाचवणे अवघड झाले असते.

नागपुरातही कोरोनाग्रस्तासाठी रुग्णालयातील बेड सोडला

दरम्यान याआधी नागपुरातही अशाचप्रकारची घटना समोर आली होती. नागपुरात राहणाऱ्या 85 वर्षीय नारायण दाभाडकर यांना काही दिवसांपूर्वी कोरोना संसर्ग झाला होता. त्यांची ऑक्सिजन लेव्हल 60 पर्यंत पोहोचली होती. मुलगी आणि जावयाने तिला इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात दाखल केलं. बऱ्याच वेळानंतर त्यांना बेड मिळाला. त्याचवेळी एक महिला आपल्या 40 वर्षीय पतीला वाचवण्यासाठी बेड शोधत असल्याचं त्यांना समजलं. मात्र बेडअभावी रुग्णालयाने त्यांना दाखल करण्यास असमर्थता दर्शवली. रडणाऱ्या महिलेला पाहून दाभाडकरांना पाझर फुटला.

बेड स्वेच्छेने सोडत असल्याचं पत्र

“मी 85 वर्षांचा झालोय, आयुष्याचा भरभरुन उपभोग घेतला, जर त्या महिलेच्या पतीचे निधन झाले, तर तिची मुलं अनाथ होतील. त्यामुळे त्या व्यक्तीचे प्राण वाचवणे हे माझे कर्तव्य आहे” अशा भावना दाभाडकरांनी व्यक्त केल्या. मी माझा बेड स्वेच्छेने दुसऱ्या रुग्णासाठी सोडत आहे, असे पत्र त्यांनी रुग्णालय प्रशासनाला दिले. दाभाडकर घरी परतले, मात्र तीनच दिवसात राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. (Rajasthan 60 year old lady vacates hospital bed for young covid patient)

संबंधित बातम्या : 

तरुण कोरोनाग्रस्तासाठी रुग्णालयातील बेड सोडला, नागपुरातील 85 वर्षीय वृद्धाचे तीन दिवसांनी निधन

पंकजा मुंडेंच्या अंगरक्षक भावाचं कोरोनानं निधन, ट्विट करत माहिती

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.