पंकजा मुंडेंच्या अंगरक्षक भावाचं कोरोनानं निधन, ट्विट करत माहिती

माकपचे सरचिटणीस येचुरींनी मुलगा गमावला, त्यानंतर काँग्रेसनं माजी मंत्री वालियांना गमावलं तर भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी त्यांच्या अंगरक्षक भावाला गमावलं (Pankaja Munde)..

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 10:00 AM, 22 Apr 2021
पंकजा मुंडेंच्या अंगरक्षक भावाचं कोरोनानं निधन, ट्विट करत माहिती
Pankja Munde

बीड : कोरोनाचा कहर आता सर्व स्तरात होताना दिसतो आहे (Pankaja Munde). माकपचे सरचिटणीस येचुरींनी मुलगा गमावला, त्यानंतर काँग्रेसनं माजी मंत्री वालियांना गमावलं तर भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी त्यांच्या अंगरक्षक भावाला गमावलं. गोविंद मुंडे असं त्यांचं नाव. खुद्द पंकजा मुंडे यांनी गोविंद यांच्यासोबतचा फोटो ट्विट करत ही माहिती दिली आहे (Pankaja Munde’s Bodyguard Brother Dies Of Corona).

पंकजा मुंडे ट्विटमध्ये म्हणतात की, माझ्या परिवारातील एका तरुण, मेहनती व धाडसी सदस्य माझा अंगरक्षक भाऊ गोविंद मुंडे कोविडनं गमावला आहे. कुटुंबाला या दु:खातून सावरण्याची शक्ती परमेश्वर देवो.

सीताराम येचुरी यांना पुत्रशोक

माकप नेते सीताराम येचुरी यांना पुत्रशोक झाला. आशिष येचुरी यांचे कोरोनावरील उपचारांदरम्यान गुरुवारी सकाळी निधन झाले. आशिष यांच्यावर गुरुग्राममधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. सीताराम येचुरी यांनी ट्विटरवरुन पुत्रनिधनाची दुःखद बातमी दिली.

“मी अत्यंत दुःखाने कळवू इच्छितो, की माझा मोठा मुलगा आशिष येचुरी याचे आज सकाळी कोरोनामुळे निधन झाले. आशिषवरील उपचारादरम्यान आमच्या मनात आशेचा किरण जागवणाऱ्या प्रत्येकाचे आम्ही आभार मानतो. डॉक्टर, नर्स, फ्रंटलाईन आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी आणि आमच्या पाठीशी उभे राहिलेले असंख्य जण” अशा आशयाचे ट्वीट सीताराम येचुरी यांनी केले आहे.

गुरुग्राममधील खासगी रुग्णालयात गुरुवारी पहाटे सहा वाजता आशिष येचुरी यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोना संसर्गानंतर दोन आठवड्यांपूर्वी आशिष येचुरींना होली फॅमिली रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात हलवण्यात आले होते.

Pankaja Munde’s Bodyguard Brother Dies Of Corona

संबंधित बातम्या :

Ashish Sitaram Yechury | सीताराम येचुरी यांना पुत्रशोक, 34 वर्षीय मुलाचे कोरोनाने निधन