Nagpur Lockdown Update : देवेंद्र फडणवीस यांच्या 10 सूचना, पालकमंत्री नितीन राऊत काय निर्णय घेणार?

| Updated on: Mar 20, 2021 | 1:59 PM

Nagpur Lockdown update news : पूर्ण लॉकडाऊनऐवजी, निर्बंध लागू करण्याच्या सूचना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिल्या.

Nagpur Lockdown Update : देवेंद्र फडणवीस यांच्या 10 सूचना, पालकमंत्री नितीन राऊत काय निर्णय घेणार?
देवेंद्र फडणवीस आणि नितीन राऊत यांचा फाईल फोटो
Follow us on

नागपूर : नागपूरमध्ये लागू करण्यात आलेला आठवडाभराचा लॉकडाऊन (Nagpur Lockdown Update) हटवण्याची चिन्हं आहेत. पूर्ण लॉकडाऊनऐवजी, निर्बंध लागू करण्याच्या सूचना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिल्या. नागपूरमध्ये लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्यासाठी पालकमंत्री नितीन राऊत यांनी महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही हजेरी लावली. (Devendra Fadnavis suggestions about Nagpur Lockdown Update will Minister Nitin Raut implement?)

या बैठकीनंतर माहिती देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “कंप्लिट लॉकडाऊनमुळे लोकांना त्रास होतो. पूर्ण लॉकडाऊन हा पर्याय नाही. पूर्ण लॉकडाऊनऐवजी, निर्बंध लागू करण्याचा मुद्दा समोर आला, तो योग्य आहे. आम्ही प्रशासनाच्या सोबत आहोत, जे निर्णय घेतील त्याची अंमलबजावणी करा”

सर्वाधिक मृत्यू नागपुरात होत आहेत, काल झालेल्या 50 मृतांपैकी 30-32 मृत्यू नागपूरमध्ये झाले आहेत. त्यामुळे बेडची संख्या वाढवणे आवश्यक आहे. शिवाय रुग्णालयातील बिलांवर देखरेखीसाठी ऑडिटर नेमणे गरजेचे असल्याचं फडणवीसांनी नमूद केलं.

होमक्वारंटाईन लोक रस्त्यावर फिरतायत, त्यांना सरळ उचलून क्वारंटाईन सेंटरमध्ये न्या, त्यांच्यावर कारवाई करा, असंही त्यांनी सूचवलं. सध्या काही लोकांनी विविध कार्यांसाठी हॉल वगैरे बूक केले होते, मात्र आता ते रद्द केले आहेत. अशा परिस्थितीत हॉलकडून पैसे दिले जात नाहीत. त्यामुळे त्यासंबंधित नियमावली तयार करा, अशा सूचना फडणवीसांनी दिल्या.

देवेंद्र फडणवीस यांच्या प्रशासनाला सूचना

कोरोना रुग्णालये आणि बेड वाढवा, स्वतंत्र कोव्हिड रुग्णालये राखीव ठेवा

कोव्हिड वॉर्ड बंद झाले आहेत, ते पुन्हा सुरु करा

बिलांवर देखरेखीसाठी ऑडिटर सुरु करा

हळू काम सुरु आहे, त्याचा वेग वाढवा

सर्वाधिक मृत्यू नागपुरात होत आहेत, 50 पैकी 30-32 मृत्यू नागपूरमध्ये

होमक्वारंटाईन लोक रस्त्यावर फिरतायत, त्यांना सरळ उचलून क्वारंटाईन सेंटरमध्ये न्या, त्यांच्यावर कारवाई करा

आयुक्तांनी फेस रेकग्नेशनबाबतची माहिती दिली, बाहेर फिरणाऱ्या लोकांना कॅमेरे ओळखतील

कार्यालये बुकिंग आहेत, ते रद्द केल्यामुळे पैसे मिळत नाहीत, SOP ठरवा

आम्ही सोबत आहोत, जे निर्णय घेतील त्याची अंमलबजावणी करा

पूर्ण लॉकडाऊनऐवजी, निर्बंध लागू करण्याचा मुद्दा समोर आला, तो योग्य आहे

VIDEO : बैठकीपूर्वी देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

महाराष्ट्रात संथ लसीकरण

देशातल्या इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मी यातला तज्ज्ञ नाही, मात्र काही राज्यात निवडणुका असतानाही तिथे रुग्णसंख्या कमी आहे. महाराष्ट्रात लसीकरण संथ गतीने सुरू आहे, ही गती वाढविली पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलं.

नागपुरातील लॉकडाऊन 

नागपूरमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने पुन्हा लॉकडाऊन करण्याची घोषणा पालकमंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी 11 मार्चला केली होती. (Nagpur Lockdown ) नागपूरमध्ये 15 ते 21 मार्चपर्यंत कडक लॉकडाऊन लावण्यात येईल, असं नितीन राऊत म्हणाले होते.

संबंधित बातम्या  

Nagpur Lockdown Update : काही राज्यात निवडणुका, तरीही तिथे रुग्णसंख्या कमी, महाराष्ट्रात संथ लसीकरण : देवेंद्र फडणवीस