Dr. Rani Bang | ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांच्या पत्नी डॉ. राणी बंग यांची प्रकृती गंभीर, ‘या’ हॉस्पिटलला ICU मध्ये उपचार

गडचिरोली जिल्ह्यात सर्च संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्यात डॉक्टर राणी बंग यांचं मोठं योगदान आहे.

Dr. Rani Bang | ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांच्या पत्नी डॉ. राणी बंग यांची प्रकृती गंभीर, या हॉस्पिटलला ICU मध्ये उपचार
Image Credit source: social media
| Updated on: Nov 16, 2022 | 3:56 PM

मोहम्मद इरफान, नागपूरः ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. राणी बंग (Dr. Rani Bang) यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती हाती आली आहे. गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील समाजसेवक डॉक्टर अभय बंग (Abhay Bang) यांच्या त्या धर्मपत्नी आहेत. मेंदूच्या आजाराने ग्रस्त असल्याने राणी बंग यांच्यावर काही दिवसांपासून उपचार सुरु आहेत. नागपूर येथील सिम्स रुग्णालयात (SIMS hospital) ICU मध्ये डॉ. राणी बंग अॅडमिट आहेत. मात्र प्रकृती अधिक गंभीर होत चालल्याने त्यांना तत्काळ मुंबई येथील रिलायन्स रुग्णालयात हलवण्यात येणार आहे.

गडचिरोली जिल्ह्यात सर्च संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्यात डॉक्टर राणी बंग यांचं मोठं योगदान आहे. गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदीसाठी डॉक्टर अभय बंग व राणी बग यांनी अखंड प्रयत्न केले.

डॉ. राणी बंग यांचे लग्नापूर्वीचे नाव डॉ. राणी चारी असे होते. त्या मूळच्या चंद्रपूर जिल्ह्यातल्या रहिवासी. त्यांचे वडिलही डॉक्टर होते. एमबीबीएस झाल्यानंतर डॉ. राणी यांनी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांच्याशी विवाह केला.

स्त्रीरोग शास्त्र या विषय़ात डॉ. राणी बंग यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले. तसेच अमेरिकेच्या जॉन हॉपकिन्स विद्यापीठातून मास्टर्स इन पब्लिक हेल्थ या विषयात त्यांनी पदवीही मिळवली.

डॉ. अभय बंग यांच्यासोबत जोडल्या गेल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी स्त्रियांच्या आरोग्यावर मोठं काम केलं. या स्त्रियांच्या आरोग्यविषयक समस्या आणि भावविश्वाचा आढावा घेणारी दोन पुस्तकं त्यांनी लिहिलं. कानोसा आणि गोईण अशी ही दोन पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

डॉ. अभय बंग आणि राणी बंग यांना अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा डीलिट, 2003 सालचा महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार तर 2018 सालचा पद्मश्री पुरस्कार त्यांना मिळाला.