Special Report : जोगेंद्र कवाडे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट, उद्धव ठाकरे यांच्यावर कुरघोडी?

| Updated on: Jan 01, 2023 | 11:33 PM

यातूनच एकनाथ शिंदे यांचा ठाकरे यांच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरु असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगतेय.

Special Report : जोगेंद्र कवाडे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट, उद्धव ठाकरे यांच्यावर कुरघोडी?
जोगेंद्र कवाडे
Follow us on

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि ठाकरे गटाच्या युतीची चर्चा सुरू आहे. आंबेडकर आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याचं मानलं जात आहे. असं असतानाच आता दलित समाजातील मोठे नेते जोगेंद्र कवाडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या दोघांमध्ये युतीची चर्चा झाल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा ठाकरे यांच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरु असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगतेय. एकीकडे राज्यात आंबेडकर आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याचं मानलं जात असतानाचा काल जोगेंद्र कवाडे यांनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली.

आधी दलित पँथर आणि आता कवाडेंनी शिंदे गटाशी जवळीक साधलीय. यातूनच एकनाथ शिंदे यांचा ठाकरे यांच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरु असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगतेय. कालच्या भेटीत शिंदे आणि कवाडे यांच्यामध्ये जवळपास तासभर चर्चा झाली.

यावेळी भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र येण्यावर चर्चा करण्यात आली. एकनाथ शिंदे यांनीही या युतीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याची प्रतिक्रिया कवाडे यांनी भेटीनंतर दिलीय.एकेकाळी शिवसेनेवर टीका करणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांनीही ठाकरे यांची जवळीक साधलीय. काही दिवसांपूर्वी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

या भेटीत प्रकाश आंबेडकरांनी शिवसेनेच्या ठाकरे गटासोबत युतीची इच्छा व्यक्त केली होती. पण जे समविचारी पक्ष आमच्या सोबत येतील त्यांना सोबत घेऊन पुढे जाणार असल्याचं शिंदे गटाच्या संजय गायकवाड यांनी म्हटलंय.

भविष्यात शिंदे आणि कवाडे एकत्र आल्यास आणि आंबेडकर आणि ठाकरे गट युती झाल्यास त्याचा ठाकरे गट आणि शिंदे गटाला किती फायदा होणार? त्यामुळे आगामी काळात राजकीय समीकरणे बदलणार का हे आता पाहावं लागेल.