Nagpur Division : नागपूर विभागीय आयुक्तपदी विजयालक्ष्मी प्रसन्ना-बिदरी रूजू, प्रभारी विभागीय आयुक्त राधाकृष्णन यांच्याकडून स्वीकारला पदभार

श्रीमती प्रसन्ना- बिदरी भारतीय प्रशासकीय सेवेतील 2001 च्या तुकडीच्या अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी सहाय्यक आयुक्त, तेजपूर, गुवाहाटी (आसाम) म्हणून काम केले आहे.

Nagpur Division : नागपूर विभागीय आयुक्तपदी विजयालक्ष्मी प्रसन्ना-बिदरी रूजू, प्रभारी विभागीय आयुक्त राधाकृष्णन यांच्याकडून स्वीकारला पदभार
नागपूर विभागीय आयुक्तपदी विजयालक्ष्मी प्रसन्ना-बिदरी रूजू
| Updated on: Aug 07, 2022 | 11:18 PM

नागपूर : नूतन विभागीय आयुक्त श्रीमती विजयालक्ष्मी प्रसन्ना- बिदरी यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार स्विकारला. प्रभारी विभागीय आयुक्त (In-charge Commissioner) राधाकृष्णन बी. यांच्याकडून त्यांनी पदभार स्विकारला. श्रीमती विजयालक्ष्मी प्रसन्ना-बिदरी यापूर्वी भारतीय अंतराळ संशोधन संस्था, (इस्रो) येथे नियंत्रक पदावर प्रतिनियुक्तीने कार्यरत होत्या. जिल्हाधिकारी श्रीमती आर. विमला (Collector R. Vimala), उपायुक्त आशा पठाण (Deputy Commissioner Asha Pathan), उपायुक्त मंजूषा ठवकर, सहायक आयुक्त हरीष भामरे उपस्थित होते.

2001 च्या तुकडीच्या अधिकारी

श्रीमती प्रसन्ना- बिदरी भारतीय प्रशासकीय सेवेतील 2001 च्या तुकडीच्या अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी सहाय्यक आयुक्त, तेजपूर, गुवाहाटी (आसाम) म्हणून काम केले आहे. त्यानंतर सहाय्यक आयुक्त, हिंगोली (महाराष्ट्र), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सिंधुदुर्ग), जिल्हाधिकारी (सिंधुदुर्ग), महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव, महाराष्ट्र महिला विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक, संचालक माहिती तंत्रज्ञान, विभाग, महाराष्ट्र शासन, त्यानंतर विजयालक्ष्मी प्रसन्ना-बिदरी यांची कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती.

प्रसन्ना यांच्याकडं पदभार सोपविला

माजी विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांची दिल्लीला टेक्सटाईल डिपार्टमेंटमध्ये बदली झाली. त्यानंतर माधवी खोडे यांच्याकडं पदभार सोपविण्यात आला होता. त्या प्रशिक्षणासाठी गेल्यानंतर हे पद प्रभारी म्हणून नागपूर मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. सांभाळत होते. आज प्रसन्ना-बिदरी यांच्याकडं त्यांनी पदभार सोपविला. नागपूर विभागात नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर व वर्धा हे जिल्हे येतात. या पूर्व विदर्भातील जिल्ह्यांच्या विभागीय आयुक्त म्हणून त्या काम पाहतील. गेल्या 20-21 वर्षांचा प्रशासकीय अनुभव बघता त्यांच्या अनुभवाचा फायदा होईल, अशी अपेक्षा अधिकाऱ्यांना आहे.