नवी दिल्ली : अग्निपथसारख्या योजना आणून केंद्र सरकार खाजगीकरण (Privatization ) करत आहे. त्यामुळे भविष्यात नोकऱ्यांतलं ओबीसी आरक्षण (OBC Federation) टिकणार नाही, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. यावरील मंथन ओबीसी महासंघात व्हावं. हे सातवं अधिवेशन आहे. याचं फलित व्हावं. ओबीसी समाज शेतीशी जुडला आहे. या देशात शेतीचं मोठं नुकसान होतंय. आपल्या देशाचा जीडीपी हा शेतीवर अवलंबून आहे. डीपीत देशाचा तिरंगा (National Tricolour) आला पाहिजे. पण जीडीपीचं काय? या देशात शेतकरी आत्महत्या करत असेल, तर भयावह परिस्थिती आहे. शेतीबद्दलची भूमिका या ओबीसी महासंघात चर्चिली जावी. जातिनिहाय जनगणना केली जावी. ही भूमिका या अधिवेशनात महत्त्वाची आहे. यावर ओबीसी महासंघात चर्चा व्हावी, अशी मागणी नाना पटोले यांनी केली.