विदर्भात यंदा पावसाची तुफान बॅटिंग, 103 टक्के पाऊस, हवामान विभागानं नेमकं काय सांगितलं?

| Updated on: Oct 07, 2021 | 7:24 PM

विदर्भाकरिता समाधानकारक म्हणजे यावर्षी 103 टक्के पावसाची नोंद झाली असल्याची माहिती प्रादेशिक हवामान खात्याने दिली आहे. विदर्भातील सर्वच अकरा जिल्ह्यात सरासरी पावसाची नोंद झाली आहे.

विदर्भात यंदा पावसाची तुफान बॅटिंग, 103 टक्के पाऊस, हवामान विभागानं नेमकं काय सांगितलं?
Follow us on

नागपूर: विदर्भाकरिता समाधानकारक म्हणजे यावर्षी 103 टक्के पावसाची नोंद झाली असल्याची माहिती प्रादेशिक हवामान खात्याने दिली आहे. विदर्भातील सर्वच अकरा जिल्ह्यात सरासरी पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद ही उपराजधानीत नागपुरात झाली आहे.

सप्टेंबर महिन्यात पावसाची तुफान बॅटिंग

ऑगस्ट महिन्यात पावसाचा अनुशेष वाढला होता. त्यामुळे जलशयातील पाणीसाठा अर्ध्यावर आला होता. मात्र, सप्टेंबर महिन्यात पावसाने तुफान बॅटिंग केली. यामुळे पावसाचा अनुशेष भरून निघाला असून आता जलाशयेदेखील तुडुंब भरून वाहत आहेत.

पावसाळा संपल्याची घोषणा लवकरच

यावर्षीचा पावसाळा संपल्याची अधिकृत घोषणा येत्या चार ते पाच दिवसात होण्याची शक्यता आहे. मात्र, प्रादेशिक हवामान खात्याने दिलेल्या आकडेवारीनुसार यावर्षी 103 टक्के पावसाची नोंद झाली आहे. यावर्षी विदर्भात मान्सून निर्धारित वेळेच्या तब्बल आठ दिवस आधी दाखल झाला होता. मात्र, त्यानंतर पावसामध्ये सातत्य दिसून आले नव्हते.

जून, जुलै महिना कोरडा गेल्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या दहा दिवसात पावसाने दमदार पुनरागमन केले होते. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात तर पावसाची तुफान बॅटिंग बघायला मिळाली. त्यामुळे नागपुरकरांना पुढ्याच्या वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे.पावसाळ्यात विदर्भात 103 टक्के पाऊस झाला, अशी माहिती नागपूर हवामान विभागाचे संचालक मोहन साहू यांनी दिली आहे.

विदर्भातील जिल्हावार पाऊस

विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये 3टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. नागपूरमध्ये 14 टक्के अधिक पाऊस झालाय. अकोला जिल्ह्यात 4 टक्के अधिक, अमरावती 7 टक्क्यांनी कमी झाला आहे. भंडारा 8 टक्के, बुलडाण्यामध्ये 6 टक्के, चंद्रपूरमध्ये 3 टक्के अधिक पाऊस झाला. गडचिरोलीत 13 टक्के पाऊस कमी झाला. गोंदिया जिल्ह्यात सुद्धा सरासरीपेक्षा ०७ टक्के पाऊस कमी झाला आहे. वर्धा जिल्ह्यात सरासरीच्या 9 टक्के पाऊस अधिक झाला. वाशिममध्ये 23 टक्के अधिक तर यवतमाळमध्ये सामान्यापेक्षा 24 टक्के अधिक पाऊस झाला आहे.

इतर बातम्या:

Weather Forecast : कोकण, पश्चिम महाराष्ट्र ते मराठवाड्यावर मुसळधार पावसाच संकट, IMD कडून नवा अंदाज जारी

मोठी बातमी ! पार्थ पवारांच्या मुंबईतील कार्यालयावर आयकर विभागाचा छापा

Nagpur Vidarbha rain update Mohan Sahoo said 103 percentage rain record during this monsoon season