तर त्या दिवशी उद्धव ठाकरे मातोश्रीच्या बाहेर येणार नाही, कुणी दिला हा इशारा?; ठाकरे कुटुंबाला धमकी?

| Updated on: Sep 14, 2023 | 10:09 AM

मनोज जरांगे पाटील हा तळागाळातील संघर्ष करणारा कार्यकर्ता आहे, कुठल्या विषयाचा अहंकार ते करणार नाहीत. समाजाचं हित काय हे जरांगे पाटलांना चांगल्या पद्धतीने माहीत असल्याने सरकार बरोबर ते योग्य पद्धतीने चर्चा करतील असा विश्वास आहे.

तर त्या दिवशी उद्धव ठाकरे मातोश्रीच्या बाहेर येणार नाही, कुणी दिला हा इशारा?; ठाकरे कुटुंबाला धमकी?
uddhav thackeray
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नागपूर | 14 सप्टेंबर 2023 : मागील सरकार हे पाटणकर सरकार होतं. हे उद्धव ठाकरेंचं सरकार नव्हतं. ज्या दिवशी पाटणकर काढा निघेल त्या दिवशी उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडणार नाहीत. एवढी काळजी स्वतःच्या आमदारांची घेतली असती तर ही वेळ आली नसती, असा इशाराच भाजपचे आमदार नितेश राणे यांनी दिला आहे. ते मीडियाशी बोलत होते.

पाटणकर काढ्याचा अर्थ एवढाच आहे की मुख्यमंत्र्यांच्या अवतीभवती पाटणकर सरकार होतं. ठाकरे सरकार नव्हतं म्हणून पाटणकर काढा आला. ज्या दिवशी उद्धव ठाकरेंना हा काढा पाजला जाईल त्या दिवशी उद्धव ठाकरे मातोश्रीच्या बाहेर पण येणार नाहीत.उद्धव ठाकरे ठाकरे जितकी खालची पातळी गाठून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करतील. त्याच्या खालच्या पातळीवर नितेश राणे उभा आहे.

उद्धव ठाकरेला दिवसा तारे दाखवण्याची तयारी आमची आहे. 39 वर्ष उद्धव ठाकरे सोबत राहिल्याने त्याची संपूर्ण कुंडली आम्हाला माहिती आहे. तो किती बसतो हे सगळं माहिती आहे. जास्त बडबड करू नये. रोज कपडे फाडू शकतो एवढी माहिती आमच्याकडे आहे, असा इशाराच नितेश राणे यांनी दिला आहे.

राऊतांना बोलण्याचा अधिकार नाही

नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावरही टीका केली. आरक्षण घालवणारा संजय राऊत यांचा मालक आहे. संजय राऊत कोणत्या तोंडाने आरक्षणाबाबत बोलत आहेत? त्यांच्याच मुखपत्रांमध्ये मराठा मोर्च्याला मुका मोर्चा म्हटलं होतं. त्यांना मराठा समाजाबद्दल बोलण्याचा अधिकार नाही, असा हल्लाच त्यांनी चढवला.

तर माजी आमदार बनतील

नितेश राणे यांनी यावेळी रोहित पवार यांच्यावरही टीका केली. रोहित पवार अजून सीनियर केजीमध्ये आहेत. त्यांनी बाहेर यावं, जग पहावं, जगभर फिरण्यापेक्षा कर्जतमध्ये लक्ष नाही घातला तर माजी आमदार बनल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

चेहरा स्पष्ट होतो

यावेळी सनातन धर्माच्या मुद्द्यावरून त्यांनी इंडिया आघाडीवर टीका केली. काल दिल्लीच्या इंडिया बैठकीमधील जी माहिती आमच्याकडे आली त्यानुसार ज्या डीएमकेने सातत्याने सनातन धर्माचा अपमान केला, हिंदू धर्माच्या विरोधात बोलतात, त्या डीएमकेच्या अभिनंदनचा प्रस्ताव मांडला गेला. त्यांच्या अभिनंदनाचा ठराव विरोधी पक्षाच्या बैठकीत घेतला गेला.

म्हणजे बाहेर डीएमकेवर टीका करायची आणि त्यांच्या बैठकीत हिंदू धर्मावर टीका करणाऱ्यांचा अभिनंदनचा प्रस्ताव होत असेल तर हे इंडिया अलायन्स कशासाठी बनवलं हे दिसून येतं. आणि यांचा चेहरा स्पष्ट होतो, अशी टीका राणे यांनी केली.