Nagpur Crime | भरदिवसा कार्यालयात काढली तलवार! तीन लाख घेऊन आरोपी पळाले, नागपुरात नेमकं काय घडलं?

नागपुरात तहसील ठाण्याअंतर्गत काल तलवारी निघाल्या. त्यामुळं कार्यालयात दहशत निर्माण झाली. पोलिसांनी बारा तासात दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

Nagpur Crime | भरदिवसा कार्यालयात काढली तलवार! तीन लाख घेऊन आरोपी पळाले, नागपुरात नेमकं काय घडलं?
अटक करण्यात आलेल्या आरोपींसोबत तहसील पोलिसांची टीम.
Image Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: Mar 02, 2022 | 1:51 PM

नागपूर : एक्सकोर्ट सर्व्हिसचे मॅनेजर (Export Service Manager) काल सकाळी साडेनऊ वाजता कार्यालयात आले. ओमप्रकाश दुक्की (वय ४३) वर्षे असं त्यांचं नाव. ते कार्यालयात कामाला लागले. तेवढ्यात दोन आरोपी त्यांच्यासमोर तलवार घेऊन आले. त्यामुळं ओमप्रकाश यांची भंबेरी उडाली. तलवार समोर पाहून ते घाबरले. आरोपींना पैसे काढायला लावली. दुक्की यांनी जवळ असलेली रक्कम त्यांना दिली. ती रक्कम सुमारे तीन लाख वीस हजार रुपये होती. रक्कम मिळताच आरोपी पसार झाले. कार्यालयात झालेला प्रकार पाहून सर्व कर्मचारी प्रचंड घाबरले (staff scared) होते. त्यांच्या अंगावर शहारे आले होते. त्या नंग्या तलवारी त्यांना डोळ्यासमोर दिसत होत्या. तहसील पोलीस (Tehsil Police) ठाण्याअंतर्गत ही घटना काल सकाळी घडली.

आरोपी त्याच कार्यालयातील जुना कर्मचारी

घटनेनंतर लगेच ओमप्रकाश दुक्की हे पोलीस ठाण्यात गेले. त्यांना पोलिसांना तोंडी माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी वरिष्ठांना माहिती दिली. पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त झोन तीन यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू झाला. पोलिसांनी सर्व माहिती गोळा केली. दोन आरोपींपैकी बकडगंज येथील गौतम भिमराव रामटेके (३५) हा याच कार्यालयात दहा वर्षापूर्वी काम करत होता. त्याचा कोणताही गुन्हेगारी रेकार्ड नाही. परंतु, दुसरा आरोपी जरीपटका येथील अशोक किसन पाटील हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. त्याच्याविरोधात चोरी, घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.

बारा तासात आरोपी जेरबंद

एपीआआय संदीप बाबू, एएसआय दुबे यांच्या पथकानं आरोपींचा शोध घेतला. बारा तासात आरोपींना जेरबंद केले. पोलिसांनी आरोपींकडून लुटलेला सगळा मुद्देमाल हस्तगत केला, अशी माहिती तहसील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयेश भांडारकर यांनी दिली. एकीकडे फेब्रुवारी महिन्यात एकही खून न झाल्यानं पोलीस खूश आहेत. तर दुसरीकडं लुटमारीच्या घटना सुरूच आहेत. त्यामुळं अशा भुरट्या चोरांवरही पोलिसांना अंकूश लावावा लागणार आहे.

Chandrapur : जास्त मूल्यांकन करून कर्जवाटप, स्टेट बँकेतील तीन अधिकाऱ्यांना अटक, आणखी कुणाकुणावर कारवाई?

क्राईम कॅपिटलकडून सुरक्षित शहराकडे नागपूरची वाटचाल!, फेब्रुवारी महिन्यात खुनाची एकही घटना नाही

Bhandara | चार दिवस झाले आई मी जेवलो नाही! युक्रेनमध्ये अडकलेल्या मुलाने सांगितली व्यथा, आई फोडतेय हंबरडा