Temprature : पुढच्या पाच दिवसानंतर पुन्हा उष्णतेची लाट, चंद्रपुरात तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पुढे जाणार

| Updated on: May 02, 2022 | 2:14 PM

मार्च महिन्यात वाढलेलं तापमान आत्तापर्यंत जैसे थे राहिल्याचं पाहायला मिळालं आहे. तसेच एप्रिल महिन्यात सुध्दा अधिक तापमानाची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत उष्माघाताने महाराष्ट्रात 374 रूग्ण आजारी आहेत

Temprature : पुढच्या पाच दिवसानंतर पुन्हा उष्णतेची लाट, चंद्रपुरात तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पुढे जाणार
पुढच्या पाच दिवसानंतर पुन्हा उष्णतेची लाट
Image Credit source: twitter
Follow us on

नागपूर – एप्रिल महिन्यात नागपूरसह (Nagpur) विदर्भातील तापमान (Temprature) 45 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलं होतं. आता मे महिन्यातंही उकाड्यापासून कुठलाही दिलासा मिळणार नाही. मे महिन्यात उकाडा कायम राहणारा आहे. पुढच्या पाच दिवसानंतर विदर्भात पुन्हा उष्णतेच्या लाटेचा (Heat Wave)इशारा देण्यात आला आहे, त्यामुळे मे महिन्यात सुद्धा उकाडा कायम असणार आहे” अशी माहिती नागपूर हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ भावना यांनी दिली आहे. विशेष म्हणजे पुढच्या तीन दिवसात विदर्भात हलक्या पध्दतीचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच मे महिन्यात उकाड्यापासून अजिबात दिलासा मिळणार नसल्याचं हवामान खात्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

महाराष्ट्रात 374 रूग्ण आजारी आहेत

मार्च महिन्यात वाढलेलं तापमान आत्तापर्यंत जैसे थे राहिल्याचं पाहायला मिळालं आहे. तसेच एप्रिल महिन्यात सुध्दा अधिक तापमानाची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत उष्माघाताने महाराष्ट्रात 374 रूग्ण आजारी आहेत. तर 25 जणांचा बळी गेल्याची शक्यता राज्याच्या आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. कामाव्यतिरिक्त उन्हात जाऊ नये, त्याचबरोबर अधिक पाणी पिण्याचा सल्ला देखील त्यांनी दिला आहे. काल सुरू झालेल्या मे महिन्यात तापमान असंच राहील. त्याचबरोबर तापमानात वाढ होण्याची शक्यता सुध्दा हवामान खात्याने व्यक्त केली आहे. पुढच्या पाच दिवसानंतर उष्णतेची लाट पुन्हा येणार आहे. पुढचे तीन दिवस विदर्भात हलक्या पावसाचा इशारा होण्याची शक्यता देखील आहे.

वाढत्या उन्हाचा आंबा बागेला फटका, 5 एकर वरील बाग जळून खाक

वाढत्या उन्हाचा व शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीचा आंबा बागेला फटका बसला आहे. कळंब तालुक्यातील दिगंबर कापसे यांची 5 एकरवरील बाग जळून खाक झाली आहे. यामुळे शेतकऱ्याचे 10 लाखांचे नुकसान झाले आहे. जळलेल्या बागेचा पंचनामा करण्यासाठी कृषी खात्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

हे सुद्धा वाचा