Video Electric Scooty | कंपनीनं तयार केलं इलेक्ट्रिक वाहन, नितीन गडकरींकडे टेस्ट ड्राईव्हसाठी; नागपुरात दुचाकीवरून फेरफटका

| Updated on: Apr 30, 2022 | 5:50 PM

घरी आलेल्या गाडीची नितीन गडकरी यांनी टेस्ट ड्राईव्हचं घेतली. ही छोटीसी, प्यारीसी इलेक्ट्रिक दुचाकी पाहून भारावून गेले. शान की, सवारी म्हणत त्यांनी घरच्या आवारात का असेना आपली हौस भागविली. यात कंपनीचे मालक जाम खूश झाले.

Video Electric Scooty | कंपनीनं तयार केलं इलेक्ट्रिक वाहन, नितीन गडकरींकडे टेस्ट ड्राईव्हसाठी; नागपुरात दुचाकीवरून फेरफटका
इलेक्ट्रिक दुचाकी चालविताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी.
Image Credit source: tv 9
Follow us on

नागपूर : गडकरी या नावातच गड आहे. मग ते जिंकल्याशिवाय कसे राहणार? तुम्ही म्हणाल काय जिंकणार. त्यांनी जिंकायचं काही ठेवलचं नाही. साधा स्वयंसेवक, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष ते केंद्रीय मंत्री हा प्रवास काही सोपा नाही. पण, आज त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. तेही त्यांच्या घराच्या आवारातच (Home Parking). होय, आज त्यांनी चक्क दुचाकी चालविली. तुम्ही म्हणाल, त्यात काय विशेष. ही दुचाकी आहे इलेक्ट्रिक. एका कंपनीनं (Company) इलेक्ट्रिक दुचाकी तयार केली. गडकरी इलेक्ट्रिक वाहनांना नेहमी आपल्या भाषणांमधून प्रोत्साहन देत असतात. म्हणून कंपनीनं ती दुचाकी दाखविण्यासाठी चक्क गडकरींच्या घरी आणली. इलेक्ट्रिक दुचाकी पाहून गडकरींना काही राहावलं नाही. नुसतं पाहण्यात काय अर्थ. ती चालविली पाहिजे. मग, गडकरी दुचाकीवर बसले. ती सुरू केली. या इलेक्ट्रिक दुचाकीवरून त्यांनी फेरफटका (Test Drive) मारला. याचा व्हिडीओ तयार झाला. तो व्हिडीओ आता व्हायरलही झाला.

भाषणांमधून इलेक्ट्रिक वाहनांचा पुरस्कार

नितीन गडकरींची भाषण ऐकणाऱ्यांची संख्या खूप आहे. त्यामुळं ते या व्हिडीओतून पैसे मिळत असल्याचं सांगतात. ते फक्त इलेक्ट्रिक वाहनं वापरली पाहिजे, असं सांगत नाही. तर प्रत्यक्ष कृतीही करतात. त्यामुळंच घरी आलेल्या गाडीची त्यांनी टेस्ट ड्राईव्हचं घेतली. ही छोटीसी, प्यारीसी इलेक्ट्रिक दुचाकी पाहून भारावून गेले. शान की, सवारी म्हणत त्यांनी घरच्या आवारात का असेना आपली हौस भागविली. यात कंपनीचे मालक जाम खूश झाले. आपलं वाहन गडकरींनी चालविलं म्हणजे विकणारचं असा त्यांचा समज झाला. तो कदाचित खराही ठरेल. कारण सध्या इलेक्ट्रिक वाहनांची चलती सुरू आहे. नागपुरात इलेक्ट्रिक वाहनं खरेदी करायची असतील तर एक ते दोन महिने वेटिंगवर राहावे लागते.

हे सुद्धा वाचा

पाहा व्हिडीओ

गडकरींनी घेतली टेस्ट ड्राईव्ह

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या घराच्या पार्किंगमध्ये इलेक्ट्रिक दुचाकी चालविण्याचा आनंद घेतला. ही गाडी एका कंपनीने दाखविण्यासाठी आणली होती. त्याचा टेस्ट ड्राईव्ह गडकरी यांनी घेतला. गडकरी यांनी दुचाकी या आधीसुद्धा चालविण्याचा आनंद घेतला आहे. महत्वाचं म्हणजे गडकरी नेहमी इलेक्ट्रिक वाहन चालविण्यासाठी प्रोत्साहन देत असतात.