
नागपूर : नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (एनएमआरडीए) आवास योजनेच्या 2980 लाभार्थ्यांना घरकुलांचे वाटप करण्यात आले. त्यापैकी 1508 लाभार्थ्यांनी दस्तावेजांची तपासणी केली आहे. खसरा क्र. 63 तरोडी (खुर्द) येथे 422 लाभार्थ्यांनी, खसरा क्र . 62 तरोडी (खुर्द) येथे 123, खसरा क्र. 12/1-2 वांजरी येथे 46 असे एकूण 634 लाभार्थ्यांनी घरकुलांची रक्कम देय केली आहे.
रक्कम देय केलेल्या लाभार्थ्यापैकी आतापर्यंत 414 लाभार्थ्यांना घरकुलांचे वाटप नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाद्वारे देण्यात आलेला आहे. उर्वरित 220 लाभार्थ्यांना डिसेंबर 2021 पर्यंत घरकुलांचे वाटप देण्याचा एनएमआरडीएचा मानस आहे. डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन केलेल्या लाभार्थ्यांनी मागणीपत्रक जमा करावे. 923 लाभार्थ्यांनी मागणीपत्रकाची रक्कम नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये भुगतान वेळेवर करावे. विहित मुदतीत केले नाही तर त्यांची सदनिका रद्द करून प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांना वाटप करावे लागेल.
एकूण 2980 लाभार्थ्यांपैकी उर्वरित 1472 लाभार्थ्यांनी आजपावेतो दस्तावेजांची तपासणी केलेली नाही. अशा लाभार्थ्यांनी 31 डिसेंबरपर्यंत दस्तावेजांची तपासणी करून घ्यावी. अन्यथा लाभार्थ्यांना वाटप करण्यात आलेले घरकुल रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे कळविण्यात आले आहे.