Video – Nagpur | प्रभाग रचनेची काम पुन्हा राज्याकडे येणार? विजय वडेट्टीवार यांनी नेमकं काय सांगितलं

| Updated on: Mar 12, 2022 | 1:41 PM

जोपर्यंत प्रक्रिया पूर्ण होतपर्यंत निवडणुका पुढे जातील. प्रभाग रचना पुन्हा करण्याची शक्यता आहे. हे खरं आहे की ऊर्जा खात्याला कमी निधी मिळाला असेल, तर पुरवणी मागण्यात निधी मिळेल. ओबीसी विभागाला राज्य सरकारचा निधी असतो, म्हणून तफावत दिसते, असंही वडेट्टीवार म्हणाले.

Video - Nagpur | प्रभाग रचनेची काम पुन्हा राज्याकडे येणार? विजय वडेट्टीवार यांनी नेमकं काय सांगितलं
नागपुरात माहिती देताना मंत्री विजय वडेट्टीवार.
Image Credit source: Facebook
Follow us on

नागपूर : 1994 पर्यंत वॅार्ड रचना, प्रभाग रचना काम ही कामं राज्य सरकारकडे होती. आता तो अधिकार राज्य सरकारकडे देण्याचा निर्णय झाला आहे, अशी माहिती राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार ( Minister of State Vijay Vadettiwar) यांनी दिली. राज्य सरकार निर्णय घेऊन राज्य निवडणूक आयोगाला कळवणार आहे. सहा महिन्यांत हे संपवून आम्ही आयोगाला निवडणूक आयोगाला (State Election Commission) सांगणार आहोत. आम्ही काल राज्यपाल यांना भेटलो. त्यांनी लगेच स्वाक्षरी केली, असंही वडेट्टीवार यांनी सांगितलं. जोपर्यंत प्रक्रिया पूर्ण होतपर्यंत निवडणुका पुढे जातील. प्रभाग रचना पुन्हा करण्याची शक्यता आहे. हे खरं आहे की ऊर्जा खात्याला (Energy Department) कमी निधी मिळाला असेल, तर पुरवणी मागण्यात निधी मिळेल. ओबीसी विभागाला राज्य सरकारचा निधी असतो, म्हणून तफावत दिसते, असंही वडेट्टीवार म्हणाले.

महाज्योतीला 250 कोटी रुपये

केंद्र सरकार ओबीसींना निधी देत नाही. कुणबी समाजाचा सारथीमध्ये समावेश आहे. लोकसंख्येनुसार निधीची आमची मागणी होती. महाज्योतीला 250 कोटी रुपये मिळालेत. महाज्योती, बार्टी आणि सारथीला सारखा निधी मिळाला. भटक्या जमातीबाबत माहिती घेण्यासाठी काम करणार आहेत, असंही विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. 15 हजार विद्यार्थ्यांना स्कील डेव्हलपमेंट प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पीएचडीच्या सर्व विद्यार्थ्यांना नोंदणी आणि अवॅार्ड झाल्यापासून 31 हजार रुपये देण्यात येणार आहेत. नोकरीचा पत्ता नाही. पण संशोधन कृषी एकाच विषयावर चाललंय. पुढच्या वर्षी ही संख्या कमी करणार आहोत.

पाहा व्हिडीओ

राज्यात सत्तापालट होणार काय?

महाराष्ट्रात सत्तापालट होणार काय, यावर विजय वडेट्टीवार म्हणाले, जय पराजय निवडणुकीत होत असतो. सत्तेत सहभागी होण्याची प्रत्येकाची इच्छा असते. लोकांच्या मनात आहे तोपर्यंत महाविकास आघाडीचं सरकार आहे. जोपर्यंत महाविकास आघाडीचा एक पक्ष फुटत नाही, तोपर्यंत या सरकारला धोका नाही, असं होण्याची शक्यता नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

वर्ध्यातील शेतकरी महिला जिल्हाधिकारी कार्यालयात जप्तीसाठी येते तेव्हा… कशी उडते कार्यालयात धांदल?

भंडाऱ्यात काम न करताच पैशांची उचल, पांदण रस्ते गायब! महालगाव ग्रामपंचायतीचा गैरकारभार?

Amravati Crime | कंत्राटदारास काढायचे होते कामाचे बिल, अभियंत्यासह लिपिक अडकले एसीबीच्या जाळ्यात