
नाशिक : देशाच्या स्वच्छ सर्वेक्षणात (Clean City) पहिल्या पाचमध्ये येण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नाशिक महानगर (NMC) पालिकेचा यंदाच्या वर्षीही स्वप्नभंग झाला आहे. मागील वर्षाच्या स्थानावरून घसरण होऊन नाशिक शहर विसाव्या स्थानी आले आहेत. एकूणच मोठे शर्तीचे प्रयत्न करूनही नाशिक (Nashik) शहराची स्वच्छ सर्वेक्षणात घसरण झाल्याने पालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षणाच्या बाबतीत केलेले कष्ट वाया गेले आहेत. राज्यातही चौथ्या क्रमांकावरून नाशिक पाचव्या स्थानावर फेकले गेले आहे. राज्यातील पहिल्या स्थानावर नवी मुंबई, पुणे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर पिंपरी चिंचवड आणि चौथ्या स्थानावर ठाणे असून नाशिक पाचव्या स्थानावर गेले आहे.
तत्कालीन आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या काळात स्वच्छ सर्वेक्षण यादीत 11 व्या स्थानी होते. त्यानंतर कोरोना काळात दोन वर्षे हे सर्वेक्षण बंद होते.
त्यानंतर आयुक्त पदी कैलास जाधव यांच्या काळात स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेत नाशिक शहर 17 व्या स्थानी आले होते. त्यांनंतर आलेले आयुक्त रमेश पवार यांनी जोरदार प्रयत्न केले होते.
मात्र, नाशिक शहराची स्वच्छ सर्वेक्षणात मोठी घसरण झाली असून 17 वरुण 20 वर नाशिक शहर गेले असून येत्या काळात मोठे प्रयत्न आणि कामे पालिकेला करावे लागणार आहे.
सर्व्हिस लेवल प्रोग्रेसमध्ये नाशिकला 2400 पैकी 2259 गुण मिळाले आहे. तर सर्टिफिकेशन वॉटर प्लस मध्ये 1800 पैकी 1000 गुण मिळाले आहे. तर सिटीझन फीडबॅकमध्ये 1800 पैकी 1733 गुण मिळाले आहे.
यामध्ये पालिकेने जलसंपदा विभागबरोबर केलेला करार कारणीभूत ठरला असून महापालिकेच्या मलजल केंद्रातून प्रक्रिया झालेल्या पाण्याचा पुन्हा वापर करणे आणि उत्पन्न मिळवणे ही एक अट त्यात होती.
एकूणच पुन्हा एकदा पालिकेच्या पदरी निराशा पडली असून पुढील वर्षी नव्याने प्रयत्न करून टॉप फाइव्हमध्ये येणाचा प्रयत्न पालिका प्रशासन करणार आहे. असे मत आयुक्त पूलकुंडवार यांनी सांगितलेय.