Nashik Corona | पुन्हा वाढतायत कोरोना रुग्ण, पण धोका कमी, जाणून घ्या आजची आकडेवारी!

| Updated on: Jan 29, 2022 | 3:32 PM

नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 36 हजार 115 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Nashik Corona | पुन्हा वाढतायत कोरोना रुग्ण, पण धोका कमी, जाणून घ्या आजची आकडेवारी!
Corona patients
Follow us on

नाशिकः नाशिक (Nashik) जिल्ह्यातील नाशिक, निफाड, सिन्नर, बागलाण, देवळा, दिंडोरी भागात झपाट्याने कोरोना (Corona) रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे अतिशय अपवादात्मक परिस्थितीत रुग्णांना अॅडमिट व्हावे लागत आहे. त्यामुळे ओमिक्रॉनचा (Omicron) धोका तूर्तास टळला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 36 हजार 115 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत 17 हजार 72 रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 797 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे. कोरोनामुळे नाशिक ग्रामीणमध्ये आजपर्यंत 4 हजार 262 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून 4 हजार 50, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून 359 व जिल्हा बाहेरील 126 अशा एकूण 8 हजार 797 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे पाहता नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

येथे आहेत रुग्ण

नाशिक जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 885, बागलाण 295, चांदवड 291, देवळा 391, दिंडोरी 395, इगतपुरी 204, कळवण 227, मालेगाव 271, नांदगाव 274, निफाड 845, पेठ 124, सिन्नर 579, सुरगाणा 102, त्र्यंबकेश्वर 196, येवला 226 असे एकूण 5 हजार 305 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 11 हजार 379, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 238, तर जिल्ह्याबाहेरील 150 रुग्ण असून, अशा एकूण 17 हजार 72 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 61 हजार 984 रुग्ण आढळून आले आहेत.

ग्रामीण भागातले रुग्ण

नाशिक ग्रामीणमध्ये काल आढळून आलेले बाधित रुग्णांमध्ये नाशिक 134, बागलाण 57, चांदवड 67, देवळा 89, दिंडोरी 41, इगतपुरी 27, कळवण 56, मालेगाव 57, नांदगाव 48, निफाड 82, पेठ 21, सिन्नर 49, सुरगाणा 15, त्र्यंबकेश्वर 33, येवला 13 असे एकूण 789 पॉझिटीव्ह रुग्ण ग्रामीण भागात आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमध्ये 94.41 टक्के, नाशिक शहरात 94.19 टक्के, मालेगावमध्ये 95.64 टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 96.50 टक्के. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 94.40 टक्के इतके आहे.

नाशिक जिल्ह्याचे चित्र

– जिल्ह्यात एकूण 4 लाख 61 हजार 984 कोरोनाबाधित.

– एकूण रुग्णांपैकी 4 लाख 36 हजार 115 रुग्णांना डिस्चार्ज.

– सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले 17 हजार 72 पॉझिटिव्ह रुग्ण.

– जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 94.40 टक्के.

इतर बातम्याः

Nivruttinath | 800 वर्षांपूर्वी संजीवन समाधी, यशापासून निवृत्ती, ज्ञानेश्वर माऊलींचे गुरू; संत निवृत्तीनाथांची यात्रोत्सवानिमित्त अनोखी ओळख!

Wine Capital Nashik | नाशिक वाईन कॅपिटल कसे झाले; ऐतिहासिक ‘पिंपेन’ची कशी झाली सुरुवात?

Nashik | नाशिक क्लायमेट ॲक्शन प्लॅन सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या, काय होणार लाभ?