Wine Capital Nashik | नाशिक वाईन कॅपिटल कसे झाले; ऐतिहासिक ‘पिंपेन’ची कशी झाली सुरुवात?

नाशिकमध्ये पहिली वायनरी चक्क 35 वर्षांपूर्वी सुरू झाली. आणि तिथूनच नाशिकचे नाव वाईन कॅपिटल म्हणून ओळखायला सुरुवात झाली. सध्या देशात एकूण 42 वायनरी असून, त्यापैकी 22 वायनरी एकट्या नाशिकमध्ये आहेत.

Wine Capital Nashik | नाशिक वाईन कॅपिटल कसे झाले; ऐतिहासिक 'पिंपेन'ची कशी झाली सुरुवात?
वाईन कॅपिटल नाशिकमधील द्राक्ष शेती.
Follow us
| Updated on: Jan 28, 2022 | 7:11 AM

नाशिकः नाशिकची (Nashik) पहिली वायनरी कोणती? वाईन कॅपिटलकडे नाशिकची वाटचाल कशी झाली? हा प्रश्न पडायचा कारण म्हणजे राज्य सरकारने घेतेला मोठा निर्णय. होय, आता राज्यात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्येही वाईन (Wine) विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जे सुपर मार्केट एक हजार स्क्वेअर फुटाच्यावर आहे. तिथे एक स्टॉल टाकून वाईन विक्रीला मुभा देण्यात येणार आहे. दहा वर्षांपूर्वीचा हा प्रस्ताव आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चालना मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकार म्हणत आहे. गोव्यात आणि हिमाचलात भाजपने हेच धोरण राबवले आहे. आम्ही भाजपचे (Bjp)धोरण स्वीकारल्याचे सरकार म्हणत आहे. मात्र, विरोधकांनी त्यावर खरपूस टीका केलीय. हे सुरूच राहणार. मात्र, देशात आणि राज्यात वाईन उत्पादनात महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला आहे. त्यातही महाराष्ट्रामध्ये नाशिकची वाईन निर्मितीत वेगळीच ओळख आहे. नाशिकमध्ये पहिली वायनरी चक्क 35 वर्षांपूर्वी सुरू झाली. आणि तिथूनच नाशिकचे नाव वाईन कॅपिटल म्हणून ओळखायला सुरुवात झाली. सध्या देशात एकूण 42 वायनरी असून, त्यापैकी 22 वायनरी एकट्या नाशिकमध्ये आहेत.

(नाशिक जिल्ह्यात खास वाईनसाठी द्राक्षलागवड केली जाते.)

असे पडले पहिले पाऊल…

मराठवाड्यातले औरंगाबाद हे बिअरच्या निर्मितीमध्ये आघाडीवर आहे, तर त्याच्याच शेजारचे नाशिक वाईन निर्मितीमध्ये पुढे आहे. नाशिकची आज वाईन निर्मितीमध्ये देशभरात एक वेगळी ओळख आहे.महाराष्ट्र आणि कर्नाटकने वाईन निर्मितीमध्ये चांगलीच भरारी घेतलीय. आपल्या राज्यात नाशिक, पुणे, सोलापूर, सांगलीकडच्या भागात मोठ्या प्रमाणात वाईनसाठी उपयोगी असणाऱ्या द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते. नाशिक जिल्ह्यात 1950 पासून द्राक्ष हे पीक घेत असल्याची नोंद सरकार दरबारी असलेल्या नाशिक जिल्हा गॅझेटियरमध्ये सापडते. नाशिक जिल्ह्यात माधवराव मोरे, हंबीरराव फडतरे, श्यामराव चौघुले, प्रल्हाद खडांगळे, जयवंत गायकवाड, अशोक गायकवाड, सदाशिव नाठे, जगदीश होळकर, शिवाजी आहेर, राजेश जाधव, हिरामण पेखळे या उद्योजकांनी वाईन उद्योजकतेमध्ये वाखणण्याजोगे काम केले आहे.

(नाशिक जिल्ह्यातील पिंपेन ही पहिली वायनरी)

पिंपेनची सुरुवात अशी…

नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथील प्रगतशील शेतकरी नेते माधवराव मोरे. त्यांनी पहिल्यांदा सहकारी तत्त्वावरील वायनरी सुरू केली. तिला नाव दिले पिंपेन. पिंपळगावच्या नावाशी साधर्म्य असलेले. या पिंपेनने फ्रान्सच्या हार्बल्ट अॅण्ड फिल्स इपर्नरी या वायनरी सोबत करार केला. त्यात वाईनची निर्मिती, विक्री वगैरे बाबी आल्या. त्यानंतर वाईनसाठी आवश्यक द्राक्षांची जिल्ह्यात अनेक ठिकाणी लागवड झाली. विशेष म्हणजे शार्डोनी, पिनॉट नॉयर यासारखा द्राक्षाचे वाण हजारो एकरांवर लावण्यात आले. या द्राक्षांचा वाईन निर्मितीमध्ये चांगला उपयोग होतो. पिंपेनने थोड्याच कालावधीत जम बसवला. 5 लाख बॉटल्सपासून पाहता-पाहता पुढे उत्पादन प्रचंड प्रमाणात वाढले. युरोप आणि फ्रान्समध्ये पिंपेनला मोठी मागणी होती. मात्र, पुढे व्यवस्थापनाचा ताळमेळ जमला नाही. शेवटी 2003 मध्ये पिंपेनने वाईन निर्मिती गुंडाळली.

(नाशिक जिल्ह्यात देशात सर्वाधिक वायनरी आहेत)

सध्या 22 वायनरीज

देशात सध्या जवळपास 42 वायनरीज आहेत. त्यापैकी 22 वायनरी एकट्या नाशिकमध्ये आहेत. त्यामुळेच ‘नाशिक व्हॅली वाइन’ला केंद्र सरकारचे महत्त्वाचे असे भौगोलिक मानांकनही (जीआय) मिळाले आहे. कोणालाही वाटेल की येथेच कसा काय वाईन निर्मितीचा उद्योग फोफावला. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे नाशिकचे अतिशय थंड असणारे आणि वाईनला पोषक असणारे तापमान. शिवाय दळवळणाच्या दृष्टीने मुंबई-पुणे हाकेच्या अंतरावर. त्यात मोठ्या प्रमाणात होणारी द्राक्ष लागवड. जिल्ह्यात जवळपास दीड ते पावणेदोन लाख एकरावर द्राक्षांची लावगड होते. त्यात अनेक शेतकरी वाईनसाठी उपयोगी असणाऱ्या द्राक्षांची आवर्जुन लागवड करतात.

(नाशिक जिल्ह्यातील वाईनची विक्रीही वाढलीय)

नाशिक जिल्ह्यात वाईनची विक्री (वर्ष 2021 – लिटरमध्ये)

– एप्रिल – 12019

– मे – 18236

– जून – 41298

– जुलै – 50588

– ऑगस्ट – 54025

– सप्टेंबर – 51957

– ऑक्टोबर – 67495

– नोव्हेंबर – 77924

इतर बातम्याः

Nashik MHADA | म्हाडा भूखंडात कोट्यवधींचा घोटाळा; मंत्री आव्हाडांचा सलग 2 ट्वीटमधून बॉम्बगोळा!

Nashik | ऑनलाईन शिक्षणाने मारले, 11 वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या; 2 महिन्यांतली तिसरी घटना

National Children’s Award | 14 किलोमीटर खाडी 4 तास 9 मिनिटांत पोहून पार; ‘स्वयंम’च्या यशाने पंतप्रधानही भारावले…!

Non Stop LIVE Update
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.