AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाढदिवसाचे सेलिब्रेशन करुन परतत असताना कुटुंबावर काळाचा घाला, चिमुकल्यासह 7 ठार

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात आज सकाळी भीषण अपघात झाला. वणी रोडवर अल्टो कार आणि मोटारसायकलची धडक झाली, ज्यात सात जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन महिला, तीन पुरूष आणि एक बालक आहेत. अपघातात दोघे जखमी झाले आहेत.

वाढदिवसाचे सेलिब्रेशन करुन परतत असताना कुटुंबावर काळाचा घाला, चिमुकल्यासह 7 ठार
nashik accident
| Updated on: Jul 17, 2025 | 10:30 AM
Share

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात आज सकाळी एक भीषण अपघात घडला आहे. नाशिकमध्ये दिंडोरी तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील वणी रोडवर मोटारसायकल आणि अल्टो कार यांच्यात जबरदस्त धडक झाली. या धडकेत सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या मृतांमध्ये तीन महिला, तीन पुरुष आणि एका लहान बालकाचा समावेश आहे, ज्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व मृत व्यक्ती कोशिंबे, देवठाण आणि सारसाळे येथील रहिवासी होते. अल्टो कारमधील गांगुर्डे कुटुंबिय त्यांच्या नातेवाईकाच्या मुलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी नाशिक येथे गेले होते. यानंतर परत दिंडोरीतील सारसाळे या ठिकाणी परतत असताना हा अपघात घडला. यावेळी अल्टो कार आणि मोटारसायकल यांच्यात जबरदस्त धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की कारच्या पुढच्या बाजूला असलेल्या काचेचा चक्काचूर झाला.

यानंतर अल्टो कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या पाण्याच्या नाल्यात उलटली. गाडीतील व्यक्तींना बाहेर पडता न आल्याने आणि त्यांच्या नाका-तोंडात पाणी गेल्याने बुडून त्यांचा मृत्यू झाला, असे प्राथमिक तपासात दिसून येत आहे. या प्रकरणी दिंडोरी पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेची माहिती मिळताच माजी नगराध्यक्ष कैलास मवाळ यांनी घटनास्थळी धाव घेऊन पीडित कुटुंबांचे सांत्वन केले.

अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे

  • देविदास पंडित गांगुर्डे (वय २८, रा. सारसाळे, ता. दिंडोरी, जि. नाशिक)
  • मनीषा देविदास गांगुर्डे (वय २३, रा. सारसाळे, ता. दिंडोरी, जि. नाशिक)
  • उत्तम एकनाथ जाधव (वय ४२, रा. कोशिंबे, ता. दिंडोरी, जि. नाशिक)
  • अल्का उत्तम जाधव (वय ३८, रा. कोशिंबे, ता. दिंडोरी, जि. नाशिक)
  • दत्तात्रेय नामदेव वाघमारे (वय ४५, रा. देवपूर, देवठाण, ता. दिंडोरी, जि. नाशिक)
  • अनुसया दत्तात्रय वाघमारे (वय ४०, रा. देवपूर, देवठाण, ता. दिंडोरी, जि. नाशिक)
  • भावेश देविदास गांगुर्डे (वय २, रा. सारसाळे, ता. दिंडोरी, जि. नाशिक)

या अपघातात मंगेश यशवंत कुरघडे (वय २५) आणि अजय जगन्नाथ गोंद (वय १८) हे दोघे जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Follow Us
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले, तुरुंगात पुस्तक लिहिलं अन्...
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट