AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिकमध्ये 79 नवे रुग्ण, एकट्या मालेगावात बाधितांची संख्या 300 वर, तर जिल्ह्यात कोरोनाचे 463 रुग्ण

कोरोनाचे हॉटस्पॉट बनलेल्या मालेगावात सर्वाधिक 33 रुग्णांची नोंद (Nashik District Corona Positive Update) करण्यात आली आहे.

नाशिकमध्ये 79 नवे रुग्ण, एकट्या मालेगावात बाधितांची संख्या 300 वर, तर जिल्ह्यात कोरोनाचे 463 रुग्ण
| Updated on: May 06, 2020 | 1:29 PM
Share

नाशिक : राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत (Nashik District Corona Positive Update) आहे. नाशिकमध्येही कोरोना विषाणूने हाहाकार पाहायला मिळत आहे. नाशिक जिल्ह्यात एका रात्रीत 79 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 463 वर पोहोचला आहे.

नाशिकमध्ये कोरोनाचे हॉटस्पॉट बनलेल्या मालेगावात सर्वाधिक 33 रुग्णांची नोंद (Nashik District Corona Positive Update) करण्यात आली. तर येवला उपजिल्हा रुग्णालयातील 16 कर्मचारी आणि नर्सेस यांना कोरोनाची बाधा झाली आहे.

तसेच एका मेडिकल ऑफिसरलाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 463 वर गेला आहे. यात एकट्या मालेगावातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा हा 382 इतका आहे.

गेल्या काही दिवसांपासून मालेगावसह नाशिक शहर, सिन्नर, चांदवड, येवला, विंचूर मनमाड येथील रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्याशिवाय लासलगाव 2, देवळाली भागात 7 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. इतकचं नव्हे तर नाशिक ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. लासलगावमध्येही दोन जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यात एका डॉक्टर आणि नर्सचा समावेश आहे.

चांदवड तालुक्यातील देवरगाव येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने लासलगाव येथील खाजगी डॉक्‍टर नर्सला कोरोनाची लागण झाली आहे. मंगळवारी उशिरा यांचे रिपोर्ट आल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रातील सर्वांचेच धाबे दणाणले आहे.

यानंतर लासलगाव, पिंपळगावजवळील गावात 100 टक्के लॉकडाऊन करण्यात आले आहेत. लासलगाव बाजार समितीत कांद्याची आलेली आवकेमुळे रस्त्यावर वाहनधारकांची मोठी गर्दी झाली आहे. ही गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांची चांगलीच दमछाक होताना दिसत (Nashik District Corona Positive Update) आहे.

संबंधित बातम्या : 

पिंपरी चिंचवडला ‘कोरोना’चा विळखा, तळवडे-चिखलीत 34 रुग्ण, कोणत्या प्रभागात किती?

Nashik Corona : नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा 426 वर, एकट्या मालेगावात 349 रुग्ण

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...