Nashik Corona : नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा 426 वर, एकट्या मालेगावात 349 रुग्ण

नाशिक जिल्ह्यात आज 41 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे नाशकातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 426 वर पोहोचला आहे.

Nashik Corona : नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा 426 वर, एकट्या मालेगावात 349 रुग्ण

नाशिक : नाशिक जिल्ह्यात आज 41 नवे कोरोना रुग्ण (Nashik Corona Virus Update) आढळून आले आहेत. त्यामुळे नाशकातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 426 वर पोहोचला आहे. तर यापैकी एकट्या मालेगावात 349 रुग्ण आहेत. मालेगावात आज 16 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये एका दोन महिन्यांच्या चिमुरडीचाही समावेश आहे. तर येवल्यातील उपजिल्हा रुग्णालयातील 16 कर्मचारी आणि परिचारिका यांनाही प्रादुर्भाव झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव (Nashik Corona Virus Update) अधिक असल्याचं चित्र आहे.

नाशिक जिल्ह्यात कुठे किती नवे कोरोना रुग्ण?

  • नाशिक – 2
  • येवला – 16
  • मालेगाव – 16
  • देवळाली – 7

नाशिक शहरात दोन नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये एका डॉक्टरलाही कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत नाशिक जिल्ह्यात 15 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यापैकी 14 मृत्यू हे मालेगावातील आहे. तर, नाशिकमधील एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

येवल्यात रुग्णालयातील कर्मचारी आणि परिचारीकांना कोरोनाची लागण

नाशकातील येवला येथील उपजिल्हा रुग्णालयातील 16 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये कर्मचारी आणि परिचारीकांचा समावेश आहे. त्याशिवाय एका वैद्यकीय (Nashik Corona Virus Update) अधिकाऱ्यालाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे.

मालेगावात कोरोनाचे थैमान, आकडा 349 वर

मालेगावात आज (5 मे) 16 कोरोना नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर, एका रुग्ण उपचारानंतर पुन्हा पॉझिटिव्ह आढळला आहे. 5 मे रोजी आलेल्या अहवालात 43 पैकी 17 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. पॉझिटिव्ह आलेल्या अहवालात 2 महिन्याच्या चिमुकलीचाही समावेश आहे. तर, एसआरपीएफचे 3 जवान आणि 5 पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. त्यामुळे मालेगावातील कोरोनाबाधितांची संख्या आता 349 वर पोहोचली आहे.

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांचा आकडा 15 हजार 525 वर

महाराष्ट्रात आज (5 मे) कोरोनाच्या 841 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यासह राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 15 हजार 525 झाली आहे. आज राज्यात 354 कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत राज्यभरात एकूण 2 हजार 819 रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

Nashik Corona Virus Update

संबंधित बातम्या :

Pune Corona | पुण्यात दिवसभरात पाच जणांचा मृत्यू, कोरोनाबाधितांचा आकडा 2,201 वर

Mumbai Lockdown | मुंबईतील सर्व सवलती रद्द; दारु विक्री बंद, बेशिस्तीमुळे आयुक्तांचा निर्णय

Pune Corona : पुण्यात 24 तासात 99 नवे रुग्ण, 8 ते 10 दिवसात रुग्णांची संख्या वाढण्याची भीती

चाकणमध्ये 800 पेक्षा जास्त कंपन्या सज्ज, नियम-अटी पाळून काम सुरु करणार

Published On - 1:18 am, Wed, 6 May 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI