Corona Update : महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांचा आकडा 15 हजार 525 वर, दिवसभरात 841 नवे रुग्ण

महाराष्ट्रात आज (5 मे) कोरोनाच्या 841 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यासह राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 15 हजार 525 झाली आहे (Latest Corona Updates of Maharashtra).

Corona Update : महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांचा आकडा 15 हजार 525 वर, दिवसभरात 841 नवे रुग्ण

मुंबई : महाराष्ट्रात आज (5 मे) कोरोनाच्या 841 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यासह राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 15 हजार 525 झाली आहे (Latest Corona Updates of Maharashtra). आज राज्यात 354 कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत राज्यभरात एकूण 2 हजार 819 रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आजपर्यंत राज्यात एकूण 1 लाख 82 हजार 884 नमुन्यांच्या कोरोना चाचणी झाल्या आहेत. यापैकी 1 लाख 67 हजार 205 जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच 15 हजार 525 जणांना कोरोना संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात एकूण 1 लाख 99 हजार 182 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. 12 हजार 456 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

दरम्यान, आज राज्यात 34 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह राज्यातील एकूण कोरोना बाधितांच्या मृत्यूची संख्या 617 झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईमधील 26, पुण्यातील 6, औरंगाबाद शहरात 1 तर कोल्हापूरमध्ये 1 मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी 24 पुरुष तर 10 महिला आहेत. आज झालेल्या 34 मृत्यूंपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 14 रुग्ण आहेत तर 16 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. 4 जण 40 वर्षांखालील आहेत. 34 रुग्णांपैकी 28 जणांमध्ये ( 82 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 943 कंटेनमेंट झोन क्रियाशील आहेत. आज एकूण 11 हजार 629 सर्वेक्षण पथकांनी काम केले. त्यांनी 50.81 लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे.

कोरोनाची अद्ययावत आकडेवारी :

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861

संबंधित बातम्या :

Pune Corona : पुण्यात 24 तासात 99 नवे रुग्ण, 8 ते 10 दिवसात रुग्णांची संख्या वाढण्याची भीती

कोरोना विषाणूवर लस तयार, इस्त्रायलच्या संरक्षण मंत्र्यांचा दावा

Malegaon Corona Update | मालेगावला कोरोनाचा विळखा, पाच दिवसात 152 रुग्णांची वाढ

दिल्लीत आयटीबीपी जवानांभोवती कोरोनाचा विळखा, 45 जणांना कोरोनाचा संसर्ग, 167 जण क्वारंटाईन

Latest Corona Updates of Maharashtra

Published On - 9:47 pm, Tue, 5 May 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI