Nashik Jobs : घरबसल्या नोकरीची संधी, ऑनलाईन रोजगार मेळाव्यात कसे व्हाल सहभागी?

नाशिकमधील हजारो बेरोजगारांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी. होय, तुमच्या दारी चक्क घरबसल्या नोकरीची संधी चालून आली आहे.

Nashik Jobs : घरबसल्या नोकरीची संधी, ऑनलाईन रोजगार मेळाव्यात कसे व्हाल सहभागी?
job alert
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Jan 25, 2022 | 7:05 AM

नाशिकः नाशिकमधील हजारो बेरोजगारांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी. होय, तुमच्या दारी चक्क घरबसल्या नोकरीची संधी चालून आली आहे. त्यासाठीच्या ऑनलाईन रोजगार मेळाव्याला सुरुवात झाली असून, येत्या 28 जानेवारीपर्यंत तुम्हाला या संधीचा लाभ घेता येणार आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने हेल्थकेअर रोजगार मेळाव्याचे (job fair) आयोजन केले आहे. या कार्यालयाकडे नोंदणी केलेल्या उमेदवारांना या मेळाव्यात सहभागी होता येणार आहे. मेळाव्यात जास्तीत जास्त तरुणांनी सहभागी व्हावे आणि नोकरीच्या संधी पटकावाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.

या जागा भरणार

मेळाव्यामध्ये शेकडो रिक्तपदे भरली जाणार आहेत. त्यात प्रामुख्याने सॅनिटरी हेल्थ हेड, डायबिटीज असिस्टंट, मेडिकल इक्विपमेंट टेक्नॉलॉजी असिस्टंट, जनरल ड्युटी असिस्टंट, अम्ब्युलन्स चालक, वॉर्डबॉय आदी जागांसाठी अर्ज मागवले आहेत. विशेष म्हणजे जिल्हा भरातील अनेक रुग्णालयात या मेळाव्यातून भरती होत आहे. त्यामुळे बेरोजगारांना नोकरीची चांगली संधी चालून आली आहे. कोरोना परिस्थितीमुळे उमेदवारांच्या मुलाखती या मोबाईल अथवा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होणार आहेत. त्यामुळे घरबसल्या या मेळाव्याचा लाभ घ्या आणि नोकरी मिळवा, असे आवाहन करण्यात आले आहे.

असा करावा अर्ज

नाशिक जिल्ह्यात ज्या संस्थामध्ये पदे भरायची आहेत, त्याची माहिती www.rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर संबंधित संस्था अपडेट करण्यात आली आहे. त्यानुसार उमेदवाराला ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. ज्यांनी ऑनलाईन अर्ज भरला असेल त्यांच्या संबंधित संस्थाकडून ऑनलाईन मुलाखती घेण्यात येतील. विशेष म्हणजे ज्या उमेदवारांनी सेवायोजन नोंदणी केली आहे, त्यांचाच इथे विचार केला जाणार आहे. त्यामुळे ज्यांनी ही नोंदणी केली नाही त्या बेरोजगारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर किंवा प्ले स्टोअरमधून mahaswayam अॅप डाऊनलोड करून नोंदणी करावी. त्यानंतर लॉगीन करून अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अडचणी असल्यास येथे साधा संपर्क

रोजगार मेळाव्यात ज्या कंपन्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी जास्तीत जास्त रिक्तपदे भरावीत. त्यासाठी www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर Pandit Dindayal Upadhaya Job Fair ऑप्शनवर क्लीक करून NASHIK HEALTH CARE JF – 8 (2021-22) येथे जी रिक्तपदे भरायची आहेत, त्याची नोंद करावी. याबाबत काही अडचणी असल्यास 0253-2972121 या फोन क्रमांकावर किंवा nashikrojgar@gmail.com या ई-मेल आयडीवर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

इतर बातम्याः

Balasaheb Thackeray | उभ्या महाराष्ट्रावर गारूड करणारा बाळासाहेब नावाचा झंझावात…!

Nashik Trees | पर्यावरण मंत्र्यांच्या एका सूचनेमुळे 200 वर्षे पुरातन वटवृक्षासह 450 झाडे वाचणार, प्रकरण काय?

Jitendra Awhad | नाशिक महापालिकेने म्हाडाचे 700 कोटींचे नुकसान केले; आव्हाडांचा हल्लाबोल, चौकशी