
नाशिक जिल्ह्यातील 15 तालुक्यांत 5 दिवसांच्या कालावधीत जवळपास 63 गर्दीच्या ठिकाणांवर हे कार्यक्रम सादर करण्यात आले.

आनंदतरंग फाउंडेशनने नाशिकमधील कालिदास कलामंदिर, गंगाघाट बाजार, सातपूर गाव बाजारपेठ, मखमलाबाद येथे कार्यक्रम केले.

नटराज लोककला अकादमीने मालेगाव शहर व तालुक्यातील महापालिकेचे कॉलेज मैदान, मालेगाव बसस्टँड, दाभाडी, वजीरखेडे येथे कार्यक्रम केले.

चाणक्य कलामंच कलापथकाने पेठ तालुक्यातील ग्रामीण आरोग्य केंद्र, कोहर बाजारपेठ, करंजाळी व जोगमोडी या ठिकाणी जनजागृती केली.

नाशिक जिल्ह्यातील या कार्यक्रमांना रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. लोककलावंताचे सादरीकरण पाहण्यासाठी रस्त्यावरही झुंबड उडाली.

नाशिक, पेठ व मालेगाव या ठिकाणी एकाच वेळी कार्यक्रमांचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमांचे जिल्ह्यात विविध ठिकाणी फेसबुकद्वारे लाइव्ह प्रसारण केले गेले.