धुळ्यात तब्बल 164 जण निवडणूक लढण्यास अपात्र, MIM च्या विद्यमान आमदाराचंही नाव!

तब्बल 164 उमेदवारांना पुढील तीन वर्षे महानगरपालिकेची निवडणूक लढवण्यास अपात्र (Dhule ineligible to contest elections) ठरवण्यात आलं आहे.

धुळ्यात तब्बल 164 जण निवडणूक लढण्यास अपात्र, MIM च्या विद्यमान आमदाराचंही नाव!
Follow us
| Updated on: Feb 18, 2020 | 3:51 PM

धुळे : नाशिक विभागीय आयुक्तांच्या कारवाईने धुळ्यातील राजकीय गोटात खळबळ उडाली आहे. तब्बल 164 उमेदवारांना पुढील तीन वर्षे महानगरपालिकेची निवडणूक लढवण्यास अपात्र (Dhule ineligible to contest elections) ठरवण्यात आलं आहे. 2018 मधील महापालिका निवडणुकीच्या खर्चाचा तपशील न सादर केल्याने आयुक्तांनी हा दणका दिला. (Dhule ineligible to contest elections)

महत्त्वाचं म्हणजे यामध्ये धुळे शहराचे एमआयएमचे विद्यमान आमदार फारुख शहा यांचंही नाव आहे. नाशिक विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी ही कारवाई केली. त्यात धुळे शहराचे एमआयएमचे विद्यमान आमदार फारुख शहा, तसेच भाजपाचे स्वीकृत नगरसेवक सोनल शिंदे यांसह काही माजी नगरसेवकांचादेखील समावेश आहे.

ही अपात्रता आदेशाच्या दिनांकापासून म्हणजेच 6 फेब्रुवारी 2020 पासून लागू असेल. 6 फेब्रुवारी 2020 रोजी हा अध्यादेश जारी करण्यात आला आहे.

धुळे महानगरपालिकेची निवडणूक डिसेंबर 2018 मध्ये झाली. यासाठी 356 उमेदवार रिंगणात होते. निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल केल्यापासून दैनंदिन खर्चाचा तपशील निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर एक महिन्यात सादर करायचा होता. त्यानुसार 167 उमेदवारांनी खर्चाचा तपशील सादर केला नाही. या उमेदवारांना नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे नोटीस बजावून खुलासा सादर करण्याची मुदत दिली होती. त्यासाठी वेळोवेळी सुनावणी घेण्यात आली. यात 164 जणांनी सादर केलेला खुलासा समाधानकारक नसल्याचे आढळून आले. त्यामुळे विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी मनपा कलम 10 (1 ई) अन्वये 164 जणांवर अपात्रतेची कारवाई केली. हे सर्वजण तीन वर्षासाठी महापालिकेची निवडणूक लढवू शकणार नाहीत.

धुळे महानगरपालिका निवडणुकीत विद्यमान आमदार फारुख शहा यांनी प्रभाग क्रमांक 13 अ मधून निवडणूक लढवली होती.  मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. तर भाजपाचे सोनल शिंदे हे सध्या स्वीकृत नगरसेवक आहे.

अपात्रतेची कारवाई झालेल्यांमध्ये तत्कालिन महिला आणि बाल कल्याण समितीच्या सभापती माधुरी अजळकर, माजी सभागृह नेता अरशद शेख,  माजी नगरसेवक रमेश बोरसे यांच्यासह इतरांचा यात समावेश आहे.

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.