Nashik TCS Case: आरोपी निदा खान हीला मोठा झटका, कोर्टाने फेटाळला अटकपूर्व जामीन

नाशिकच्या धर्मांतरण केस प्रकरणात शनिवारी नाशिक रोड न्यायालयाने मोठा निर्णय देत आरोपी निदा खान हीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.

Nashik TCS Case: आरोपी निदा खान हीला मोठा झटका, कोर्टाने फेटाळला अटकपूर्व जामीन
Nashik TCS Case
| Updated on: May 02, 2026 | 7:49 PM

नाशिकच्या बहुचर्चित टीसीएस प्रकरणात नाशिक रोड न्यायालयाने आरोपी निदा खान हीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. कोर्टाने दोन्ही बाजूंच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर हा निर्णय दिला आहे. सरकारी पक्षाने आरोप केला की पीडीतेला धार्मिक रितीरिवाजाकरीता प्रभावित केले गेले. तिचे नाव बदलले गेले आणि त्याची कागदपत्रे आरोपीकडे होती.

या प्रकरणाच्या तपासासाठी आरोपी निदा खान  हीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला जाणे ही बाब महत्वाची म्हटली जात आहे. कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर आपला निर्णय राखून ठेवला आणि आज हा निकाल सुनावला. या प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने वकील अजय मिसर हे न्यायालयात हजर होते. तर आरोपींच्या वतीने वकील राहुल कासलीवाल यांनी युक्तीवाद केला. २९ एप्रिल रोजी या याचिकेवर बंद कक्षात सुनावणी झाली. त्यावेळी विशेष तपास पथकाच्या वतीने सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांनी तपास अधिकारी म्हणून आपली बाजू मांडत जामिनाला विरोध केला.

या आधी १८ एप्रिल रोजी देखील आरोपीच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली होती. ज्यात बचाव पक्षाने त्यांची बाजू सविस्तरपणे मांडली. त्यानंतर तपास पथकांनी सादर केलेल्या पुरावे आणि दस्ताएवजांवर न्यायालयाने गंभीरपणे विचार केला.

हिजाब परिधान कसा करावा हे शिकवले

सरकारी पक्षाने दावा केला की आरोपीने पीडीतेला धार्मिक रिती रिवाजसाठी प्रभावित केले, तिला हिजाब घालायला शिकवले. धार्मिक परंपरेसंबंधित नियम तिच्या फोनमध्ये टाकले आणि विविध धार्मिक सामग्री तिला पाठवली. या प्रकरणात मलेशियाशी देखील संभाव्य लिंक तपासली जात आहे.

पीडीतेचे नाव बदलले होते

पीडीतेच्या वकीलाने कोर्टात सांगितले की पीडीतेचे नाव बदलण्यात आले होते. आणि जरुरी दस्तावेज आरोपी दानिशकडे होते. हा देखील आरोप लावण्यात आला आहे की नोकरी आणि पदौन्नतीच्या बहाण्याने पुढील कट रचण्यात आला. सरकारी वकील अजय मिसर यांनी कोर्टात सांगितले की पीडीता मागासवर्गीय समाजाशी संबंधित आहे. तिला कथित रुपाने प्रभावित करण्याचा प्रयत्न केला गेला. तपासाच्या वेळी काही पुस्तके आणि अन्य सामग्री जप्त करण्यात आली. ज्यांना पंचनामा अंतर्गत न्यायालयात सादर करण्यात आले.

जबानीत सामील केले डिजिटल पुरावे –

तपासात पीडीतेचा जबाब, फोनचे मॅसेज, डिजिटल पुरावे आणि कुटुंबाच्या सदस्याची जबान्या सामील केल्या गेल्या. सरकारी पक्षाने हे देखील सांगितले की आरोपीने पीडीतेला प्रभावित करण्यासाठी धमकावणे आणि घाबरवण्याचाही प्रयत्न केल्याचा आरोप असून याचा तपास सुरु आहे. कोर्टाच्या या निर्णयानंतर आता तपास यंत्रणांना आता पुढील कारवाई करण्यासाठी मोकळीक मिळाली आहे. अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने आरोपी पक्षाला मोठा झटका लागला आहे.

 

Follow Us