सरस्वतीला पाहिलं नाही असे म्हणणाऱ्या भुजबळांनी त्याच सरस्वती देवीची आरती केली?

| Updated on: Oct 01, 2022 | 8:21 PM

आरती आणि दर्शनाच्या नंतर भुजबळ यांनी माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया महत्वाची ठरली आहे. त्यात त्यांनी केलेल्या दाव्यावर ठाम असल्याचे अप्रत्यक्षपने पटवून दिलंय.

सरस्वतीला पाहिलं नाही असे म्हणणाऱ्या भुजबळांनी त्याच सरस्वती देवीची आरती केली?
Image Credit source: TV9 Network
Follow us on

नाशिक : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सरस्वती देवी बद्दल केलेल्या विधानावरून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. त्यातच छगन भुजबळ हे आज नाशकचे (Nashik) ग्रामदैवत असलेल्या कालिका देवीच्या (Kalika Temple) दर्शनाला गेले होते. तिथे त्यांनी आरती सुद्धा केली. पण, याच कालिका देवीच्या मंदिरात तीन देवीच्या मूर्ती आहे. त्यात मध्यभागी कालिका असून एका बाजूला सरस्वती आणि दुसऱ्या बाजूला महालक्ष्मीची मूर्ती आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांनी कालिका देवीच्या दर्शनाबरोबर केलेल्या आरतीत सरस्वती देवी आणि महालक्ष्मीची आरती देखील केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी ज्या सरस्वतीला पाहिलं नाही तिची पूजा कशाला करायची असे म्हणत शाळांमध्ये महापुरुषांचे फोटो लावले पाहिजे असे वादग्रस्त विधान केले होते.

दरम्यान छगन भुजबळ यांनी केलेल्या विधानावरुन राज्यभर टीकेची झोड उठत असतांना भुजबळ यांच्याकडून कळत-नकळत का होईना सरस्वतीची आरती झाली आहे.

पण याच आरती आणि दर्शनाच्या नंतर भुजबळ यांनी माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया महत्वाची ठरली आहे. त्यात त्यांनी केलेल्या दाव्यावर ठाम असल्याचे अप्रत्यक्षपने पटवून दिलंय.

हे सुद्धा वाचा

छगन भुजबळ यांनी या ठिकाणी सरस्वती मातेची मूर्ती आहे की नाही याची आपल्याला कल्पना नाही मात्र आपण नाशिकचे ग्रामदैवत म्हणून कालिकादेवी ओळखली जाते

आणि त्यासाठी आपण दर्शनासाठी आल्याचं सांगत पुन्हा एकदा आपल्या भूमिकेवर ते ठाम असल्याचं त्यांनी अप्रत्यक्ष बोलून दाखवलं आहे.

यानंतर छगन भुजबळ यांनी नाशिक येथे निर्माण केलेल्या भव्य स्वामीनारायण मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थिती लावता न आल्याने तिथेही जाऊन दर्शन घेतले.

एकूणच गेल्या काही दिवसांत भुजबळ यांच्या हिंदू विरोधी असल्याची देखील टीका होत होती, त्याच पार्श्वभूमीवर भुजबळ यांनी देवदर्शन केल्याने चर्चेला उधाण आले आहे.