एकनाथ शिंदे यांना सर्वात मोठा झटका, नाशिकमधील खासदाराचा मराठा आरक्षणासाठी राजीनामा

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधून एक मोठी बातमी समोर आलीय. एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील बड्या नेत्याने आपल्या खासदारकीचा राजीनामा दिलाय. त्यांनी आपला राजीनामा एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केल्याची माहिती समोर आलीय.

एकनाथ शिंदे यांना सर्वात मोठा झटका, नाशिकमधील खासदाराचा मराठा आरक्षणासाठी राजीनामा
Mahad Gram Panchayat Election Result 2023
| Updated on: Oct 30, 2023 | 8:22 PM

नाशिक | 30 ऑक्टोबर 2023 : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधून एक मोठी बातमी समोर आलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मराठा आरक्षण लवकर लागू केलं जाईल. त्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. मराठा समाजाने आरक्षणासाठी सरकारला काही दिवस द्यावे. आरक्षण नक्की मिळेल, असं आवाहन करण्यात येत आहे. विशेष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन आपण मराठा समाजाला आरक्षण मिळवून देऊ, असं आश्वासन दिलं. पण आता त्यांच्याच पक्षाचे खासदार, नाशिकमधील बडे नेते हेमंतल गोडसे यांनी टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनी मराठा आरक्षणासाठी थेट खासदारकीचा राजीनामा दिला आहे.

विशेष म्हणजे मराठा आरक्षणासाठी शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी काल राजीनामा दिल्याची माहिती समोर आली होती. त्यांच्या पाठोपाठ बीडमध्ये भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आलीय. लक्ष्मण पवार यांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्ददेखील केलाय. त्यानंतर आता नाशिक जिल्ह्यातील खासदार हेमंत गोडसे यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आलीय.

मराठा कार्यकर्ते आक्रमक, आमदारांचे बंगले आणि ऑफिसची जाळपोळ

मराठा कार्यकर्त्यांच्या आंदोलनाला काही ठिकाणी आता हिंसक वळण लागताना दिसत आहेत. बीडच्या माझलगाव येथे आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्याची मराठा आंदोलकांनी जाळपोळ केली. मराठा आंदोलकांनी त्यांची गाडीसुद्धा जाळली आहे. तसेच माजी आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्या कार्यालयाला आग लावलीय. तर आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घराला देखील आग लावल्याची माहिती समोर आलीय. बीडमध्ये मराठा कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवनला आग लावली आहे. तसेच एका हॉटेलला देखील आग लावण्यात आलीय. या प्रकरणातील आणखी मोठी घटना म्हणजे मराठा आंदोलकांनी संभाजीनगरमध्ये भाजप आमदार प्रशांत बंब यांचं कार्यालय फोडलं आहे. तर यवतमाळमध्ये मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात गोंधळ घालण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. यवतमाळमध्ये काळे झेंडे दाखवणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.