“मालेगावमध्ये उद्धव ठाकरे यांच्या सभेला एक लाखांची गर्दी होणार”; ठाकरे गटानं शिवसेनेला दुसरं आव्हान दिलं..

| Updated on: Mar 20, 2023 | 5:24 PM

दोन दिवसांपूर्वी सिन्नरला मुख्यमंत्री सांगितले होते की शेतकऱ्यांचे 100 टक्के नुकसानभरपाई आम्ही देऊ मात्र कालच्या सभेत मदतीविषयी मुख्यमंत्र्यांनी काहीच मत व्यक्त केले नाही अशी टीकाही विनायक राऊत यांनी त्यांच्यावर केली आहे.

मालेगावमध्ये उद्धव ठाकरे यांच्या सभेला एक लाखांची गर्दी होणार; ठाकरे गटानं शिवसेनेला दुसरं आव्हान दिलं..
Follow us on

नाशिक : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये सभा झाल्यानंतर त्याच गोळीबार मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही सभा झाली. या दोन्ही सभेनंतर शिवसेना आणि ठाकरे गटाच्या नेत्यांकडृन एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर भाजपचे आमदार निलेश राणे यांनी ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला होता.त्यांच्या त्या टीकेला खासदार विनायक राऊत यांनी उत्तर देताना निलेश राणेला आम्ही कधीच गिणतीत पकडत नाही असा टोला त्यांनी त्यांना लगावला आहे.

निलेश राणे यांच्यावर टीका करताना त्यांनी त्यांना आवाहनही दिले आहे. ते म्हणाले की, उलट माझे आव्हान आहे की ईजा, बिजा, तिजा तिसऱ्यांदा आपटायचे असे आणि 2-3 लाखांनी पराभूत व्हायचे असेल तर त्यांनी उभा रहावे असं म्हणत त्यांनी त्यांच्या पराभवालाही त्यांनी आमच्या शुभेच्छा असल्याचे म्हटले आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा घेतल्यानंतर विनायक राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरही जोरदार निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांच्या द्वेषाची काविळ झाली असल्याची टीका त्यांनी त्यांच्यावर केली आहे. रत्नागिरीतील सभेनंतर आता उद्धव ठाकरे यांची मालेगावला सभा होत आहे.

त्या सभेविषयी विश्वास व्यक्त करताना विनायक राऊत यांनी सांगितले की, मालेगावची उद्धव ठाकरे यांची ही सभा एक लाख गर्दीची होणार आहे त्यामुळे त्यांना हे दिसणार नाही असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

रत्नागिरीतील सभेनंतर एकनाथ शिंदे यांच्या सभेवर टीका करताना विनायक राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांचे भाषण म्हणजे पोपटपंच्छी होती.

त्यांनी केलेले भाषण हे स्वतःचे स्क्रिप्ट नव्हते. काल त्यांनी भाषण वाचून दाखवल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सभेतून लोकं निघून गेल्याचा टोलाही विनायक राऊत यांना लगावला.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख आम्ही काय करायचा की नाही ते या बेईमान लोकांनी शिकवू नये असा घणाघातही त्यांनी शिवसेनेवर केला.

अनिल जयसिंघनी याच्या मुलीबाबत आता तक्रार दिली जाते त्यांची आणि कोणा कोणाचे किती वर्षांपासून संबंध आहे याचा तपास व्हावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.

हा सिंघानी उद्धव साहेबांना भेटल्याचे फोटो भाजपवाले दाखवत आहेत. मात्र त्यांना कोणी आणले तेत आता मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसले आहेत अशी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी यावेळी अवकाळी पावसात झालेल्या नुकसानीवर बोलताना म्हणाले की, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

दोन दिवसांपूर्वी सिन्नरला मुख्यमंत्री सांगितले होते की शेतकऱ्यांचे 100 टक्के नुकसानभरपाई आम्ही देऊ मात्र कालच्या सभेत मदतीविषयी मुख्यमंत्र्यांनी काहीच मत व्यक्त केले नाही अशी टीकाही विनायक राऊत यांनी त्यांच्यावर केली आहे.