Video: कार, बाईक नको रे बाबा…त्यापेक्षा आपली बैलगाडीचं बरी; अन् वरात निघाली देवगावला

| Updated on: Apr 18, 2022 | 9:43 PM

लग्नानंतर नववधूला कोणी बुलेटवरुन, कोणी हेलिकॉप्टरमधून लग्नमंडपातून आपल्या घरापर्यंत घेऊन गेल्याचे उदाहरण आहेत, परंतु इंधनाच्या दरात दररोज वाढ होत असल्याने हे दर आता गगनाला भिडले आहेत.

Video: कार, बाईक नको रे बाबा...त्यापेक्षा आपली बैलगाडीचं बरी; अन् वरात निघाली देवगावला
नाशिकमधील निफाड तालुक्यात एक अनोखं लग्न
Image Credit source: TV9
Follow us on

नाशिकः सध्या भारतात एकाच कुटुंबात राहून एकमेकांना विचारणार नाहीत, पण रस्त्यात भेटणाऱ्या कोणत्याही माणसाला कुणीही आज पेट्रोल-डिझेलचा दर काय असं सहज विचारतील,अशी सध्याची परिस्थितीआहे. रोज बातम्या, मेसेज, सोशल मीडियावर मिम्स अशा अनेक मार्गांनी वाढणाऱ्या दरवाढीबद्दल (Prise) लोकं चिंता व्यक्त करत आहेत. अशीच चिंता आता एका नवदांपत्याला पडली आहे, त्यामुळे पेट्रोल डिझेल (Petrol diesel) दरवाढीवर एक नामी शक्कल त्यांनी लढवली आहे. इंधनाच्या दरात वाढ झाली आहे, रोज नवेनवे दर जाहीर केले जातात, त्यामुळे सामान्य माणसाला आता ही दरवाढ परवडणारी नाही.

त्यामुळे निफाड तालुक्यातील (Nashik Nifad) नवदांपत्याने या दरवाढीचा निषेध करण्यासाठी चक्क नवदांपत्य लग्न मंडपापासून घरापर्यंत बैलगाडीतूनच प्रवास केला आहे. ही अनोखी वरात निघाली आहे ती निफाड तालुक्यातील देवगाव येथे.

दर आता गगनाला भिडले

लग्नानंतर नववधूला कोणी बुलेटवरुन, कोणी हेलिकॉप्टरमधून लग्नमंडपातून आपल्या घरापर्यंत घेऊन गेल्याचे उदाहरण आहेत, परंतु इंधनाच्या दरात दररोज वाढ होत असल्याने हे दर आता गगनाला भिडले आहेत.

अनोख्या पद्धतीने निषेध

या इंधनाच्या दरवाढीचा अनोख्या पद्धतीने निषेध करण्यासाठी निफाड तालुक्यातील देवगांव येथे चक्क नवदांपत्याने लग्नानंतर सजविलेल्या बैलगाडीतून लग्नमंडपातून ते घरापर्यंतचा प्रवास केला आहे.

विवाहनंतर निषेध

निफाड तालुक्यातील देवगाव येथील सचिन निकम आणि नाशिक येथील नांदूर गावातील कोमल राजेंद्र शिंगवे यांचा देवगाव येथे मोठ्या उत्साहात विवाह सोहळा पार पडला. पण इंधनाच्या दरात दररोज वाढ होत इंधनाचे दर गगनाला भिडल्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.

नवदांपत्याच्या हातात बैलाचा कासारा…

या आधीही आपण नववधूची पाठवणी हेलिकॉप्टर, कोणी बुलेट तर कोणी मर्सिडीजमधून केल्याचे उदाहरण बघितले आहेत मात्र आता या वाढत्या इंधनाच्या दरामुळे बुलेटवरून नववधूची पाठवणी करणे अवघड झाले आहे. त्यामुळे लग्नानंतर रविवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सचिन निकमने सजविलेल्या बैलगाडीतून नववधू कोमल हिला घेत बैलाचा कासरा हातात धरत सर्जा-राजाच्या साक्षी देवगाव येथून निकम वस्तीपर्यंत पाच ते सहा किलोमीटर प्रवास केला आहे.

अनोखा क्षण अनेकांच्या मोबाईलमध्ये

यानिमित्ताने वधू-वरांचे अनेकांनी ठिकठिकाणी स्वागत झाले आहे. अनेकांनी हा क्षण आपल्या मोबाईलमध्ये टिपले आहे. तर काहींनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करत इंधन दरवाढीचा अनोखा निषेध या वधू-वरांकडून केल्याचे म्हटले आहे.

संबंधित बातम्या

Narayan Rane : गद्दारी करणाऱ्या सेनेनं हिंदुत्वाचे उपदेश देऊ नये, राऊतांचं मानसिक संतुलन बिघडलं-नारायण राणे

Power shortage: दलालीतील टक्केवारीसाठी आघाडीकडून कृत्रिम वीजटंचाई; माधव भांडारींकडून जोरदार हल्लाबोल

PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 एप्रिल रोजी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करणार, कारण काय?