भाकरीच्या चंद्राला महागाईचं ग्रहण; 8 महिन्यांत गॅस सिलिंडर दर 190 रुपयांनी वाढले

| Updated on: Sep 02, 2021 | 4:15 PM

पेट्रोल, डिझेल, खाद्यतेलासोबतच आता गॅस सिलिंडरचे दर गगनाला भिडल्यानं सामान्यांची कोंडी झालीय. ऑइल कंपन्यांनी 1 सप्टेंबरपासून स्वयंपाकाच्या गॅसचे दर तब्बल 25 रुपयांनी वाढवलेत. यामुळं नाशकात स्वयंपाकाच्या गॅसचे दर तब्बल 888.50 रुपयांवर गेलेत.

भाकरीच्या चंद्राला महागाईचं ग्रहण; 8 महिन्यांत गॅस सिलिंडर दर 190 रुपयांनी वाढले
स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडर दरात वाढ.
Follow us on

नाशिकः पेट्रोल, डिझेल, खाद्यतेलासोबतच (Petrol) आता गॅस सिलिंडरचे (Gas) दर गगनाला भिडल्यानं सामान्यांची कोंडी झालीय. (Inflation) ऑइल कंपन्यांनी 1 सप्टेंबरपासून स्वयंपाकाच्या गॅसचे दर तब्बल 25 रुपयांनी वाढवलेत. यामुळं नाशकात (Nashik) स्वयंपाकाच्या गॅसचे दर तब्बल 888.50 रुपयांवर गेलेत. विशेष म्हणजे गेल्या आठ महिन्यांत गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये 190 रुपयांची वाढ झालीय. (gas-cylinder-prices-have-risen-by-rs-190-in-the-last-eight-months)

कोरोनाच्या संकटानं सामान्यांचं जगणं हैराण केलंय. गेल्या दोन वर्षांत झालेल्या टाळेबंदीनं अनेकांच्या हातचे रोजगार हिरावले गेले. हजारो कुटुंब आर्थिक संकटाच्या खाईत लोटली गेली. आता पुन्हा तिसऱ्या लाटेची भीती वर्तवली जात आहे. त्यामुळं पुन्हा लॉकडाऊन होणार का, याची धास्ती अनेकांनाय. यात पेट्रोल, डिझेल, खाद्यतेलाच्या वाढलेल्या दरानं सामान्यांना हैराण केलंय. त्यातच १ सप्टेंबरपासून स्वयंपाकाच्या गॅसचे दर महागल्यानं सामान्यांचं आर्थिकदृष्ट्या कंबरडं मोडलंय. या वर्षी 1 जानेवारीपासून आतापर्यंत स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे दर तब्बल 190 रुपयांनी वाढलेत. विशेष म्हणजे 1 मार्च 2014 पासून तब्बल 478 रुपयांची ही वाढय. 1 मार्च 2014 रोजी हे दर 410 रुपये 50 पैसे होते.

महिन्यातून दोनदा दरवाढ

प्रत्येक महिन्याच्या एक आणि पंधरा तारखेनंतर गॅस दरवाढीचं धोरणं तेल कंपन्यांनी स्वीकारलंय. गेल्या महिन्यात स्वयंपाकाच्या गॅसचे दर दोनदा वाढले. प्रत्येक वेळेस 25 रुपये म्हणजे 50 रुपयांची वाढ झाली. विशेष म्हणजे जुलै महिन्यात 25.50 आणि मार्च महिन्यातही 25 रुपयांनी स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची दरवाढ झालीय.

व्यावसायिकांनाही फटका

गॅस सिलिंडर दरवाढीचा फटका व्यावसायिकांनही बसलाय. व्यावसायिक वापराच्या सिलिंडरचे दर 1 सप्टेंबरपासून 73 रुपयांनी वाढलेत. त्यामुळे एका सिलिंडरसाठी व्यावसायिकांना तब्बल 1703 रुपये मोजावे लागतायत. आधीच कोरोना टाळेबंदीनं हॉटेल, रेस्टॉरंट बंद होते. आत्ता कुठं सारं सुरळीत सुरू असताना ही दरवााढ झाल्यानं व्यावसायिकांमध्ये संतापाची भावनाय.

अनुदानाची माया आटली

देशात मे 2020 मध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेचा कहर सुरू होता. सामान्य एकीकडं जीवाच्या भीतीनं घरात होता. याच काळात अनेकांचा व्यवसाय गाळात गेला. कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या. अनेक जणांनी खिशात पैसे नसल्यानं आणि दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असल्यानं चक्क पायी गाव गाठला. या काळात वर्षाला बारा घरगुती गॅस सिलिंडर अनुदानित दरानं देण्याचं धोरण सरकारनं अचानक बंद केलं. याबाबतही सामान्यांतून संताप व्यक्त होतोय. (gas-cylinder-prices-have-risen-by-rs-190-in-the-last-eight-months)

इतर बातम्याः 

अहो आश्चर्यम्, नाशकातून शेकडो नाले चोरीला!

नाशिकमध्ये पालिका निवडणुकीआधी मनसे सक्रीय, प्रत्येक मनसैनिकाच्या घरावर झेंडा फडकावणार