Murder : माता न तू वैरिणी, आईने दिली मुलाच्या हत्येची सुपारी, असं काय घडलं ज्याने पोटच्या गोळ्याला संपवलं?

आईच्या प्रेमाची जगात कुठेही तुलना होवू शकत नाही. मात्र गतिमंद आणि मनोरुग्ण मुलाच्या त्रासाला कंटाळून वयोवृद्ध आईने आपल्या पोटच्या मुलाच्याच खुनाची सुपारी दिल्याची धक्कादायक घटना नांदगाव तालुक्यातील ढेकू येथे घडली. दरम्यान, याप्रकरणी अवघ्या 24 तासात पोलिसांनी संशयित आईसह एकास अटक केली आहे.

Murder : माता न तू वैरिणी, आईने दिली मुलाच्या हत्येची सुपारी, असं काय घडलं ज्याने पोटच्या गोळ्याला संपवलं?
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Jul 09, 2022 | 5:12 PM

मालेगाव : नांदगावच्या (Nandgaon) ढेकु येथे खळबळजनक घटना घडलीयं. जन्मतात्या आईने मुलाच्या खुनाची सुपारी देऊन हत्त्या केलीयं. नांदगावच्या ढेकु येथील या घटनेने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जनार्धन पेंढारे असे हत्त्या (Murder) झालेल्या तरुणाचे नाव आहे. हत्त्या करून मृतदेह विहिरीमध्ये गोणीत भरून फेकण्यात आला होता. पोलिसांनी (Police) आरोपींना ताब्यात घेतले आहे. मुलगा मनोरुग्णासारखा वागून सतत मारहाण करत असल्यानेच आईने हे मोठे पाऊस उचलल्याचे कळते आहे.

मनोरुग्ण मुलाच्या त्रासाला कंटाळून आईने दिली हत्येची सुपारी

आईच्या प्रेमाची जगात कुठेही तुलना होवू शकत नाही. मात्र गतिमंद आणि मनोरुग्ण मुलाच्या त्रासाला कंटाळून वयोवृद्ध आईने आपल्या पोटच्या मुलाच्याच खुनाची सुपारी दिल्याची धक्कादायक घटना नांदगाव तालुक्यातील ढेकू येथे घडली. दरम्यान, याप्रकरणी अवघ्या 24 तासात पोलिसांनी संशयित आईसह एकास अटक केली आहे.

सतत आईला त्रास देऊन करत होता मारहाण

याबाबत अधिक माहिती अशी की, ढेकू येथील जनार्दन पेंढारे हा गतिमंद होता. त्याचा विवाह देखील झाला होता. मात्र गतिमंद असल्यामुळे पत्नी सोडून गेली होती. त्यानंतर तो सतत आईला त्रास देत असून मारहाण देखील करीत होता. याच त्रासाला कंटाळून आई जनाबाई पेंढारे हिने दौलत भड याला आपल्या मुलाचा खून करण्यासाठी 15 हजारांची सुपारी देवून त्यांचा खून केला.