भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन, नाशिकमध्ये भाजप कार्यकर्ते आक्रमक, लोकशाही वाचवा दिवस पाळण्याचा इशारा

| Updated on: Jul 05, 2021 | 5:42 PM

भाजपच्या 12 आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन करण्यात आलं. विधानसभेतील भाजपच्या 12 आमदारांचं निलंबनाविरोधात नाशिक भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन, नाशिकमध्ये भाजप कार्यकर्ते आक्रमक, लोकशाही वाचवा दिवस पाळण्याचा इशारा
भाजप
Follow us on

नाशिक: पावसाळी अधिवेशनाच्या (Assembly Monsoon Session) पहिल्याच दिवशी विधानसभा उपाध्यक्षांच्या दालनात जोरदार राडा पाहायला मिळाला. सत्ताधारी आणि भाजप आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली. इतकंच नाही तर तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनाही धक्काबुक्की आणि शिविगाळ करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेनंतर भास्कर जाधव यांनी आपलं मत सभागृहात मांडलं. त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी भाजप आमदारांच्या निलंबनाचा ठराव मांडला आणि हा ठराव आवाजी बहुमतानं मंजूरही करण्यात आलाय. भाजपच्या 12 आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन करण्यात आलं. विधानसभेतील भाजपच्या 12 आमदारांचं निलंबनाविरोधात नाशिक भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. (Nashik BJP party workers protest against BJP MLA suspension decision)

नाशिकचे संकटमोटक गिरीश महाजन यांचही निलंबन

विधानसभेतील भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन केल्यामुळे नाशिकमध्ये भाजप पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. 12 आमदारांमध्ये नाशिकचे संकटमोचक मानल्या जाणाऱ्या गिरीश महाजन यांचा ही समावेश असल्यानं भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले. आमदारांचे निलंबन तात्काळ मागे घ्यावे अशी मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदनादवारे केली आहे.

भाजप लोकशाही वाचवा दिन पाळणार

महाविकास आघाडी सरकारनं दोन दिवसातच विधिमंडळाच अधिवेशन गुंडाळल तर भाजपकडून लोकशाही वाचवा दिन पाळला जाणार आहे, असा इशारा भाजप कार्यकर्त्यांनी दिला आहे. 12 आमदारांच निलंबन म्हणजे भाजपचा आवाज दाबण्याचा कुटील प्रयत्न असल्याचा आरोप भाजपच्या नाशिक पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

भाजपच्या कोणत्या आमदारांचं निलंबन?

ओबीसी आरक्षणावरील ठरावावर चर्चा सुरू असताना राजदंड उचलणे, माईक ओढणे आणि सभागृह अध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी आज एकूण 12 सदस्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. आशिष शेलार, योगेश सागर, अभिमन्यू पवार, संजय कुटे, अतुल भातखळकर, पराग अळवणी, गिरीश महाजन, राम सातपुते, हरीश पिंपळे, नारायण कुचे, जयकुमार रावत किर्तीकुमार बागडीया आदी आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे. या वर्षभरात त्यांना मुंबई आणि नागपूर येथील अधिवेशनात सामिल होण्यास मज्जाव करण्यात आला आहे. संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी ही माहिती आज विधानसभेत दिली.

इतर बातम्या:

विधानसभेत जोरदार राडा, भाजपच्या कोणत्या आमदारांवर कारवाईची शक्यता?

ओबीसी आरक्षणासंदर्भातला ठराव राज्य सरकारकडून मंजूर, या ठरावाने ओबीसींना आरक्षण मिळणार नाही, फडणवीसांचा दावा

(Nashik BJP party workers protest against BJP MLA suspension decision)