नाशिकमध्ये सर्वपक्षीय कोरोना आढावा बैठक, छगन भुजबळ आणि भाजप आमदारांची शाब्दिक चकमक

| Updated on: May 08, 2021 | 5:37 PM

नाशिकमध्ये वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यलयात बैठक पार पडली.

नाशिकमध्ये सर्वपक्षीय कोरोना आढावा बैठक, छगन भुजबळ आणि भाजप आमदारांची शाब्दिक चकमक
राहुल आहेर छगन भुजबळ
Follow us on

नाशिक : नाशिकमध्ये वाढत्या कोरोनाच्या (Nashik Corona cases) पार्श्वभूमीवर आज पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यलयात बैठक पार पडली. या बैठकीला विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवळ,कृषिमंत्री दादा भुसे यांच्यासह स्थानिक आमदार खासदार तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. भुजबळ यांनी सर्व परिस्थितीचा आढावा घेतला, तसेच वाढत्या रुग्णसंख्येबाबत लोकप्रतिनिधींची मतं घेतली. (Nashik Corona update all party meeting clashes between Chhagan Bhujbal and BJP MLA Rahul Aher)

मात्र या बैठकीदरम्यान देवळा-चांदवड विधानसभेचे भाजप आमदार राहुल आहेर (BJP MLA Rahul Aher) आणि पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक उडाली. भाजप आमदार राहुल आहेर यांनी प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा पाढाच वाचला. नाशिक जिल्हा रुग्णलयात बेड वाढवले जात नाहीत,काही बेड पडून आहेत, तर कळवणच्या ग्रामीण रुग्णलयात सिटी स्कॅन मशीन धूळखात पडून आहे. त्याचा वापर का केला जात नाही,असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यानंतर छगन भुजबळांनी सूचना करा म्हणून सुनावलं यावेळी चांगलीच शाब्दिक चकमक झाली.

आमदार राहुल आहेर काय म्हणाले? 

मात्र यावर आमदार राहुल आहेर यांना माध्यमांनी शाब्दिक चकमकीबाबत विचारलं असता त्यांनी,ही आमची सर्वांचीच भूमिका असल्याचं म्हटलं. पालकमंत्री यांच्यासह सर्वांनाच वाटतं की परिस्थिती सुधारली पाहिजे, मात्र काही अधिकारी माहितीबाबत दिशाभूल करत असल्याची शक्यता वाटते. तसेच ग्रामीण भागातील रुग्णांना शहरात अॅडमिट करून घेतलं जातं नाही. त्यामुळे रुग्णांची परवड होते. लसीसंदर्भातही ग्रामीण भागात पुरेशी जागरुती झालेली नाही. त्यामुळे अनेक नागरिक लस घेत नाहीत. त्यामुळे प्रशासनाने याबाबत पावलं उचलली पाहिजे, असं राहुल आहेर म्हणाले.

VIDEO :

छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत मांडलेले महत्वाचे मुद्दे –

– दर आठवडयाला आम्ही मीटिंग घेतो सरकारच्या नियमांच्या अधीन
– आज सर्वांची मीटिंग बोलावली
– आता आकडा वाढतोय
– अनेक ठिकाणी लॉकडाऊन लावला आहे
– काही जिल्ह्यांनी लॉकडाऊन केलं
– याबाबतच जाणून घेण्यासाठी माहिती घेतली
– आता सर्व विचार लक्षात घेता निर्णय घेऊ
– आरोप करण्यासाठी मीटिंग नव्हती – राहुल आहेर यांना टोला
– ऑक्सिजन आणि रॅमिडीसिव्हर तक्रारी कमी झाल्या आहेत
– माहिती खोटी नाही,शहरी आणि ग्रामीण भागातील माहिती वेगळी
– कलेकटर एकत्रित माहिती देतात
– तो गैरसज दूर झाला आहे
– मला तो मुद्दा योग्य वाटत नाही,
– ऑक्सिजनचा तुटवडा सर्वत्र आहे
– ऑक्सिजन ची खातरजमा असल्या शिवाय ऑक्सिजन बेड वाढवणे योग्य नाही
– लसीकरण केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे
– 2 कोटी लोकांचं लसीकरण बाकी
– 18 वर्षाच्या वरील लोकांना लस देणार,लस उपलब्ध नाही कशी देणार
– मे एन्ड पर्यँत लस उपलब्ध होईल
– यात केंद्र,राज्य आहे,मात्र लसिंचा तुटवडा आहे
– मला कोणाला दोष द्यायचा नाही
– आदिवासी भागात लस घेत नाहीत,नॉर्मल उपचार करूम घरीच राहतात,मात्र आता त्यावर उपाय योजना करू,नरहरी झिरवळ त्यात लक्ष घालतील
: झाकीर हुसेन हॉस्पिटल ऑक्सिजन प्रकरण –
– दोषींवर कारवाई होईल,कमिटी नेमली आहे.

(Nashik Corona update all party meeting clashes between Chhagan Bhujbal and BJP MLA Rahul Aher)