
नगरपरिषद आणि नगर पंचायत निवडणुकीनंतर आता महापालिका निवडणुका आहेत. महाराष्ट्रातील 29 महानगर पालिकांसाठी येत्या `15 जानेवारीला मतदान होणार असून 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. मुंबई, ठाणे, केडीएमसी, पुणे, नागपूर आणि नाशिक या महत्वाच्या महानगरपालिका आहेत. महापालिका निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून राज्यात पक्षांतराला वेग आला आहे. खासकरुन महाविकास आघाडीतून सत्ताधारी महायुतीमधील पक्षांमध्ये प्रवेश करण्याचं प्रमाण अधिक आहे. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी या पक्षांकडे मविआमधून फुटून बाहेर पडणाऱ्यांचा कल आहे. नुकताच नगरपरिषदा आणि नगर पंचायतींचा निकाल जाहीर झाला. त्यात महायुतीने घवघवीत यश संपादन केलं. त्यामुळे शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या जास्त आहे.
ऐन निवडणुकांच्या काळातनाशिक मध्ये मोठा धक्का बसला. काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव आणि माजी नगरसेवक राहुल दिवे यांनी राजीनामा दिला. काँग्रेस पक्षाच्या पदाचा आणि सदस्य पदाचा राजीनामा दिवे यांनी दिला. तसेच माजी नागरसेसक आशा तडवी यांनी देखील राजीनामा दिला. स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यासाठी मुभा दिला जात नसल्याने माझी नाराजी आहे असं त्या म्हणाल्या.
आज संध्याकाळी बैठक घेऊन पुढील निर्णय
“महापालिका निवडणुकांसाठी मनसेसह इतर पक्षांसोबत आघाडी करण्याची आमची इच्छा होती. मात्र पक्षाने परवानगी नाकारली. आघाडी झाली नाही तर नुकसान होईल ही आमची भूमिका आम्ही मांडली होती” असं राहुल दिवे यांनी सांगितलं. “भाजप किंवा शिंदेच्या शिवसेनेत जाण्याची कार्यकर्त्यांची इच्छा आहे. आज संध्याकाळी बैठक घेऊन पुढील निर्णय घेणार” असं राहुल दिवे म्हणाले.
कल्याण–डोंबिवलीत राष्ट्रवादी शरद पवार गटाची मोठी खेळी
KDMC महापालिका आयुक्तांकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचा अधिकृत ‘ए’ फॉर्म दाखल. 75 अर्ज, 30–35 मुलाखती पूर्ण. महाविकास आघाडी माध्यमातून निवडणूक लढण्याची तयारी. लवकरच महाविकास आघाडी मधील प्रमुख नेत्यांची बैठक होऊन 26 तारखेपर्यंत अधिकृत उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार.
ठाण्यात महापालिका निवडणुकीचे वारे
ठाणे महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरू झाले आहे. ठाण्यातील टेंभी नाका, आनंद आश्रम या ठिकाणी शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांच्या आज मुलाखती घेतल्या जात आहेत. खासदार नरेश मस्के ,माजी आमदार रविंद्र फाटक ,माजी महापौर मीनाक्षी शिंदे ,ठाणे शहर अध्यक्ष हेमंत पवार सह इतर नेते या सर्व उमेदवारांची मुलाखत घेत आहेत.