रमजान मुबारकः मालेगावामधील लाल मशिद देशात नंबर 1; महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा…!

सौदी अरेबिया स्थित अल फौजान फाउंडेशनच्या वतीने जगातील सर्वोत्तम मशिदींचा सर्व्हे केला जातो. दर तीन वर्षांनी सर्व्हे करून या पुरस्कारांचे वितरण होत असते. यंदा या सर्व्हेमध्ये मालेगावच्या मशिदीने बाजी मारल्याबद्दल आनंद व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्राच्या शिरपेचात हा मानाचा तुरा खोवला गेला आहे.

रमजान मुबारकः मालेगावामधील लाल मशिद देशात नंबर 1; महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा...!
मालेगावमधील लाल मशिद.
| Edited By: | Updated on: Apr 11, 2022 | 10:56 AM

मालेगावः देशभरात मशिदींचे शहर म्हणून नाशिक (Nashik) जिल्ह्यातल्या मालेगावची (Malegoan) धार्मिकदृष्ट्या एक वेगळी ओळख आहे. ही ओळख शहराच्या इकरा नगरमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा उत्तम आविष्कार ठरलेल्या हाजी अब्दुल रऊफ मशिदच्या (लाल मशिद) रुपाने सातासमुद्रापार पोहचली आहे. सौदी अरेबियातील जागतिक दर्जाच्या ‘अल फौजना सोशल फाउंडेशन’ पुरस्कार स्पर्धेसाठी 17 देशांमधून निवडलेल्या 22 मशिदींमध्ये (Masjid) मालेगावच्या लाल मशिदीचा समावेश झाला आहे. भारतात अव्वल स्थान पटकावून ही मशीद जागतिक स्पर्धेसाठी पात्र ठरल्याने मालेगावकरांना रमजान महिना मुबारक ठरला आहे. सौदी अरेबिया स्थित अल फौजान फाउंडेशनच्या वतीने जगातील सर्वोत्तम मशिदींचा सर्व्हे केला जातो. दर तीन वर्षांनी सर्व्हे करून या पुरस्कारांचे वितरण होत असते. यंदा या सर्व्हेमध्ये मालेगावच्या मशिदीने बाजी मारल्याबद्दल आनंद व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्राच्या शिरपेचात हा मानाचा तुरा खोवला गेला आहे.

जागतिक स्पर्धेत नामांकन

2022 साठी जगातील 200 मशिदींचा सर्व्हे करण्यात आला. यात जॉर्डन, तुर्की, बांग्लादेश, फ्रान्स, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, भारत आदी 17 देशांच्या 22 मशिदींना अंतिम स्थान देण्यात आले आहे. सर्व्हेमध्ये मशिदीची रचना, बांधकामाचा टिकावू दर्जा, वेगळेपण, नवीन बांधकाम संकल्पना, आकर्षकता, तंत्रज्ञान या गोष्टींचा विचार केला जातो. या निकषात भारतातील एकमेव मशीद म्हणून लाल मशिदीचा समावेश झाला आहे. निवडलेल्या मशिदींचे गुणांकन होऊन नोव्हेंबर 2022 ला कुवैतमध्ये होणाऱ्या विशेष समारंभात पुरस्कार विजेत्या मशिदींच्या नावाची घोषणा केली जाणार आहे.

लाल मशिदीचे वैशिष्ट्ये

मशिदीचे बांधकाम 2011 मध्ये सुरू करण्यात आले होते. पाच वर्षांत 2016 ला बांधकाम पूर्ण झाले आहे. 900 स्वेअर मीटरमध्ये निर्माण झालेल्या मशिदीत एकाच वेळी हजार व्यक्ती नमाज पठण करू शकतात. आरसीसी बांधकामाला लाल विटांचे आवरण बसविल्याने मशिदीला लाल मशीद नाव पडले आहे. या विटा गुजरातमधून आणल्या आहेत. ऊन, वारा, पावसाचा विटांवर परिणाम होत नाही. मूळ बांधकाम व विटांच्या आवरणात 4 इंच जागा मोकळी आहे. यामुळे बाहेरील तापमानाचा फारसा फरक पडत नाही. मशिदीचे आतील वातावरण नेहमी थंड असते. मशिदीत 24 तास हवा खेळती राहते.
इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Kumar Vishvas Birth Day Special | सृजन का बीज हूँ, जाया हो नही सकता, 10 वर्ष राजकारण, हजारो वर्ष कविता!!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!