
नाशिकः नाशिकच्या खेळाडूंनी आपल्या खेळाने राज्याचे व देशाचे नाव उंचावले आहे. 1952 मध्ये महाराष्ट्राच्या खाशाबा जाधव यांनी ऑलम्पिकमध्ये भारताला सुवर्ण पदक प्राप्त करून दिले. त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीतूनच यापुढेही नाशिकमधून आतंरराष्ट्रीय दर्जोचे खेळाडू तयार व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त करत राज्यपाल (Governor) भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी खेळाडूंच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. राज्यपालांच्या हस्ते अर्जुन, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त विजेत्यांचा यशोकिर्ती सन्मानाने गौरव करण्यात आला. दी. एस. एस. के. वर्ल्ड क्लब, पाथर्डी येथे हा सोहळा झाला. यावेळी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, क्लबचे शैलेश कुटे, डॉ. जयश्री कुटे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमात राज्यपाल म्हणाले की, डॉक्टर, इंजिनिअर, वकील यासारख्या विविध क्षेत्रात यश मिळविण्यासाठी तरुण पिढी मेहनत घेते आणि त्यांना आई वडिलांचा देखील पाठिंबा असतो. त्याचप्रमाणे पालकांनी आपल्या मुलांचे क्रीडा क्षेत्रात करिअर घडविण्यासाठी त्यांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, नाशिकमध्ये चांगल्या दर्जाचे रुग्णालय, तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी पर्यटनाच्या दृष्टीने बोटक्लब सारख्या विविध सुविधा निर्माण झाल्या आहेत. तसेच खेळाच्या दृष्टीने अभिमान वाटावा असे दी. एस. एस. के. वर्ल्ड क्लबही आहे. या क्लबमुळे खेळाडूंना चांगल्या दर्जाच्या सुविधा मिळणे सोयीच होणार आहे. नाशिकमधील कविता राऊत, दत्तू भोकनळ सारख्या खेळांडूनी नाशिकचे नाव आतंरराष्ट्रीय स्तरावर पोहचविले आहे. त्याचबरोबर पुरस्कार प्राप्त दिव्यांग खेळांडूची कामगिरीही कौतुकास्पद असल्याचे भुजबळ म्हणाले.
अर्जुन पुरस्कार विजेती आतंरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत आणि रोईंगपटू दत्तू भोकनळ, शिवछत्रपती पुरस्कार विजेते क्रीडा शिक्षक अशोक दुधारे, नरेंद्र छाजेड, गोरखनाथ बलकवडे, आनंद खरे, अविनाश खैरनार आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते संघटक सुनील मोरे, साहेबराव पाटील, विजेंद्र सिंग, अंबादास तांबे, राजू शिंदे, शेखर भंडारी यांचा यावेळी गौरव करण्यात आला.
श्रद्धा वायदंडे, अविनाश खैरनार, शेखर भंडारी, संजय होळकर, सुषमा प्रधान, श्यामा सारंग, वैशाली फडतरे, सतीश धोंडगे, विष्णू निकम, राजेश गायकवाड, भक्ती कुलकर्णी, नीलेश गुरुळे, अनुराधा डोणगावकर, योगेश पटेल, श्रध्दा नालमवार, तुषार माळोदे, सुनील मोरे, श्रेया गावंडे, लहानू जाधव, ज्ञानेश्वर निगळ, श्रृती वायदंडे, तनुजा पटेल, हंसराज पाटील, वैशाली तांबे, शरयू पाटील, स्नेहल विधाते, अस्मिता दुधारे, किसन तडवी, सचिन गलांडे, संजीवनी जाधव, सायली पोहरे, विधीत गुजराथी, रोशनी मुर्तडक, डॉ. महेंद्र महाजन, डॉ. हितेंद्र महाजन, भक्ती कुलकर्णी, संतोष कडाळे, मोनिका आथरे, अक्षय देशमुख, अक्षय अष्टपुत्रे, राजेंद्र सोनार, पूजा जाधव, सुलतान देशमुख, नसरत रफीउद्दीन, सुर्यभान घोलप, जागृती शहा या खेळाडूंचाही यावेळी गौरव झाला.